शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

लाचखोर अरुण माळी कारागृहात

By admin | Updated: June 12, 2014 01:24 IST

अडीच लाखांच्या लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे विशेष न्यायाधीश टी. एम. लालवानी यांच्या न्यायालयाने आज आरोपी सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण माळी यांना

मेडिकलमध्ये खळबळ : अतिदक्षता विभागात दिली जात होती ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’नागपूर : अडीच लाखांच्या लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे विशेष न्यायाधीश टी. एम. लालवानी यांच्या न्यायालयाने आज आरोपी सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण माळी यांना न्यायालयीन कोठडी सुनावून मध्यवर्ती कारागृहाकडे रवानगी केली. शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मनोहर निमजे याला पोलीस निरीक्षक अरुण माळी यांच्यावतीने अडीच लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली होती. रविवारी या दोघांनाही पोलीस कोठडी रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांनाही दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. पोलीस कोठडी रिमांडमध्ये असताना, माळी यांनी छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्यांना सोमवारी मेडिकल कॉलेज इस्पितळाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले होते. माळी यांना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’दिली जात असल्याच्या लोकमतच्या वृत्ताने खळबळ उडून बुधवारी माळी यांना इस्पितळातून सुटी देण्यात आली. लागलीच या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांनी माळी यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावून त्यांची कारागृहाकडे रवानगी केली. माळी यांच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून, त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, न्यायालय आवारातील हल्ल्याच्या घटनेच्या वेळी माळी यांनी घातलेले कपडे एसीबीने ताब्यात घेतलेले आहे. मेडिकलच्या अतिदक्षता विभागात गरीब रुग्णांना अनेकवेळा केवळ औपचारिकता म्हणून दाखल केले जाते. उपचारासाठी डॉक्टरांची गयावया करावी लागते, मात्र त्याचवेळी विशेष काहीही न झालेल्या लाचखोर अरुण माळीला अतिदक्षता विभागाच्या वातानुकूलित खोलीत ठेवण्यात आले होते.माळी आपल्याला मधुमेह असल्याचे सांगत असताना, तो घेत असलेल्या औषधाचे त्याला नाव माहीत नव्हते, हे विशेष. औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन) विभागाचा अंतर्गत वॉर्ड क्र . २४ हा अतिदक्षता विभाग येतो. मेडिकलमधील हा विभाग सर्वात व्यस्त आहे. (प्रतिनिधी)