शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

टीडीआर घोटाळ्याला लागणार ब्रेक

By admin | Updated: June 10, 2015 02:50 IST

काही वर्षांपूर्वी वाठोडा येथे अग्निशमन विभागासाठी आरक्षित असलेल्या जमिनीचा टीडीआर

कमलेश वानखेडे / राजीव सिंह नागपूरकाही वर्षांपूर्वी वाठोडा येथे अग्निशमन विभागासाठी आरक्षित असलेल्या जमिनीचा टीडीआर (ट्रान्सफर आॅफ डेव्हलपमेंट राईट) जारी करीत धंतोली येथील एका इस्तितळावर लोड करण्यात आला होता. संबंधितप्रकरणी आरक्षित जमिनीच्या मालकाने आक्षेप घेतला. वाठोडा येथील संबंधित जमीन एक हजार रुपये वर्ग फुटाच्या आधारावर उपलब्ध होती. मात्र, या जमिनीचा टीडीआर सहा ते सात हजार रुपये वर्ग फूट किंमत असलेल्या जमिनीवर लोड झाला होता. हा घोटाळा खूप गाजला. मात्र, आता असे प्रकार करता येणार नाहीत. राज्य सरकारने टीडीआरच्या नियमात बदल करण्याची तयारी चालविली असून त्याला बाजार मूल्याशी जोडण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे भविष्यात एखाद्याच्या जमिनीचा टीडीआर जारी झाला तर त्याच्या खसरा नंबरचा रेडीरेकनरचा भाव त्यावर नोंदविला जाणार आहे. टीडीआरच्या नियमात बदल करण्यासाठी राज्य सरकारने परिपत्रक जरी करीत सूचना व आक्षेप मागविले आहेत. संबंधित निर्णय नगर रचना विभागाने घेतला आहे. यामुळे टीडीआर हस्तांतरणात होणाऱ्या घोटाळ्यांवर ब्रेक लावण्यासोबतच शहरातील दाट वस्त्यांमध्ये बहुमजली इमारतींवरही अंकुश लावण्यात यश मिळणार आहे. रामदासपेठ, शिवाजीनगर, शंकरनगर, बजाजनगर आदी भागात मोजकीच जमीन शिल्लक आहे. संबंधित जमिनीला कोट्यवधी रुपयांची किंमत दिली जात आहे. या जमिनींवर शहराच्या बाह्य भागातील आरक्षित जमिनीचा टीडीआर लोड केला जात आहे. सध्या हा गोरखधंदा जोरात सुरू आहे. नव्या नियमाचे कायद्यात रूपांतर झाले तर जमिनीच्या किमती कमी होतील. शहराचा संतुलित विकास होण्यास मदत होईल. याशिवाय झोन आधारावर टीडीआर लोड करण्याच्या प्रणालीतही बऱ्याच त्रुटी आहेत. त्या दूर होतील. प्रस्तावित बदलात टीडीआरचे इंडेक्सिंग केले जाईल. नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर लोड होणार नाही. सध्या एक हजार वर्ग मीटरच्या प्लॉटवर एक एफएसआय तसेच त्यापेक्षा अधिकवर १.२५ एफएसआय बांधकामाची परवानगी दिली जाते. काय आहे टीडीआर?शहराच्या डेव्हलपमेंट प्लानमध्ये नागरिकांची जमीन आरक्षित घोषित केली जाते व त्या जमिनीचा उपयोग शासकीय व सार्वजनिक उपयोगासाठी केला जातो. सरकार संबंधित जमीन आपल्या ताब्यात घेऊन त्या जमिनीच्या बरोबरीचे विकासाचे अधिकार जमीन मालकाला दिले जातात. याला ट्रान्सफर आॅफ डेव्हलपमेंट राईट (टीडीआर) असे म्हणतात. जमीन मालकाला संबंधित टीडीआर आपल्या सीमा क्षेत्रातील कोणत्याही मालमत्तेवर लोड करता येतो. संबंधित नियम जमीन मालकाच्या लाभासाठी तयार करण्यात आला आहे. १५ वर्षांत जारी झाले ३० टीडीआर महापालिकेच्या नगर रचना विभागातर्फे आरक्षित जमिनीच्या बदल्यात २००१ पासून ते आजवर सुमारे ३० टीडीआर जारी झाले आहेत. आजवर महापालिकेने १६.६४ हेक्टर जमीन अधिग्रहित करून १ लाख ८८ हजार १०० वर्ग मीटर टीडीआर जारी केला आहे. माहिती अधिकार अंतर्गत मागविलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झाले आहे. जारी करण्यात आलेल्या टीडीआरवर महापालिकेच्या सभागृहात दीड वर्षांपूर्वी काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर टीडीआरमध्ये घोळ झाल्याची काही प्रकरणे समोर आली होती.