शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात  बजरंग दलाकडून वाहतूक नियमांची ऐशीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:37 IST

‘व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध करण्यासाठी बजरंग दलाकडून मंगळवारी दुपारी मोटरसायकलवर इशारा रॅली काढण्यात आली. या रॅलीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमांची खुलेआम पायमल्ली केली. आश्चर्याची बाब म्हणजे एरवी सामान्यांवर कारवाई करणाऱ्या  वाहतूक पोलिसांनी या इशारा रॅलीतील नियमभंगासंदर्भात केवळ बघ्याची भूमिका घेतली.

ठळक मुद्देहा कसा ‘व्हॅलेन्टाईन डे’ विरोध? : वाहतूक पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध करण्यासाठी बजरंग दलाकडून मंगळवारी दुपारी मोटरसायकलवर इशारा रॅली काढण्यात आली. या रॅलीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमांची खुलेआम पायमल्ली केली. आश्चर्याची बाब म्हणजे एरवी सामान्यांवर कारवाई करणाऱ्या  वाहतूक पोलिसांनी या इशारा रॅलीतील नियमभंगासंदर्भात केवळ बघ्याची भूमिका घेतली.दरवर्षीप्रमाणे यंदादेखील बजरंग दलातर्फे ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या विरोधात इशारा रॅली काढण्यात आली. दुपारी ३ च्या सुमारास लोकमत चौकातूनच रॅलीला सुरुवात झाली. बजाज नगर, कॉफी हाउस चौक, महाराजबाग, व्हेरायटी चौक मार्गे रॅलीचा समारोप संविधान चौकात झाला. या रॅलीत कार्यकर्ते विना हेल्मेट दुचाकी चालवत होते. काही कार्यकर्ते चालत्या मोटरसायकलच्या मागील सीटवर उभे राहून घोषणा देत होते. काही कार्यकर्ते चक्क ‘ट्रीपल सीट’ होते. मात्र या रॅलीविरोधात वाहतूक पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.पदाधिकारी म्हणतात, केले नियमांचे पालनया इशारा रॅलीच्या वेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या विरोधात घोषणाबाजी केली. आम्ही प्रेमाचा विरोध करत नाही. मात्र ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या नावाखाली अश्लीलतेचा प्रसार होत आहे. या पाश्चिमात्य संस्कृतीचा विरोध करण्यासाठीच आम्ही ही भूमिका घेतली आहे. रॅलीमध्ये आमच्या सर्वांकडे हेल्मेट होते. परंतु हेल्मेटमुळे घोषणा देत येत नसल्यामुळे त्यांना वाहनांच्या ‘डिक्की’त ठेवण्यात आले होते. आम्ही वाहतूक नियमांचे पालन केले व प्रत्येक सिग्नलला गाड्या थांबविल्या, असे प्रतिपादन बजरंग दलाचे नागपूर महानगर संयोजक मनीष मौर्य यांनी दिली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीValentine Day 2018व्हॅलेंटाईन डे