शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

 नागपुरातील ३७२ इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 22:43 IST

महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना कायद्याचे काटेकोर पालन झाले पाहिजे. नोटीस बजावल्यानंतरही आग प्रतिबंधक उपाययोजना न करणाऱ्या ३७२ इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी गुरुवारी महापालिका मुख्यालयात आयोजित समन्वय समितीच्या बैठकीत दिले.

ठळक मुद्देआयुक्त वीरेंद्र सिंह यांचे निर्देश : अग्निशमन नियमांचे पालन न करणाऱ्या इमारतींवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना कायद्याचे काटेकोर पालन झाले पाहिजे. नोटीस बजावल्यानंतरही आग प्रतिबंधक उपाययोजना न करणाऱ्या ३७२ इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी गुरुवारी महापालिका मुख्यालयात आयोजित समन्वय समितीच्या बैठकीत दिले.यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (साप्रवि) महेश धामेचा, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप कार्यकारी अभियंता डी.डी. जांभुळकर यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.अग्निशमन व आणीबाणी विभागातर्फे शहरातील ७८२ इमारतधारक व भोगवटदारांना आग प्रतिबंधक उपाययोजना नसल्याने नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र त्यापैकी ३७२ इमारतींनी अद्यापही काही उपाययोजना न केल्याने अशा इमारतीमधील पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश आयुक्तांनी जलप्रदाय विभाग, ओसीडब्ल्यू व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ, एसएनडीएल च्या अधिकाऱ्यांना दिले.कळमना परिसरातील रेल्वेची सुरक्षा भिंत तुटल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या इमारतीचे बांधकाम व ट्रॅकवरील स्वच्छतेबाबत त्वरित कारवाई करा, नागरिकांनी ये-जा करण्यासाठी कळमना ते नागपूर ट्रॅक लगतच्या भिंतीला भगदाड पाडले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ते पुन्हा पूर्ववत करण्यासाठी ४५ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. यासंबंधीच्या अंदाजपत्रकाची प्रत मनपा आयुक्त कार्यालयाकडे पाठवून त्वरित कामाला सुरुवात करावी, असे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी निर्देशित केले.समन्वय बैठक विकास कामांच्या दृष्टीने आणि नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यामुळे या बैठकीला सर्व विभागप्रमुखांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले.खोदकामाची प्रकरणे निकाली काढामहानगरपालिका क्षेत्रात रस्त्यावर खोदकाम करताना महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्याशिवाय रस्त्यांचे खोदकाम करणाºया विभागांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच रस्ते खोदकामासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासची सुद्धा परवानगी घेऊन त्या संबंधी रीतसर पत्र सादर करण्यात यावे. याशिवाय रस्ते खोदकामासंर्भातील सर्व प्रकरणे येत्या शनिवारपर्यंत निकाली काढण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्त