शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

नागपूरच्या गोरेवाड्यातील ‘इंडियन सफारी’ला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 11:01 IST

आंतरराष्ट्रीय गोरेवाडा वन्यजीव क्षेत्रात प्रस्तावित ‘इंडियन सफारी’ची महत्त्वाकांक्षी योजना थंडबस्त्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनाच्या स्थानबदलाचा परिणाम डिझाईनमध्येही बदल

योगेंद्र शंभरकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय गोरेवाडा वन्यजीव क्षेत्रात प्रस्तावित ‘इंडियन सफारी’ची महत्त्वाकांक्षी योजना थंडबस्त्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत इंडियन सफारीचे काम पूर्णत्वास येईल आणि याच काळात या योजनेचे उदघाट्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र दरवेळी उपराजधानीत होणारे हिवाळी अधिवेशन यावेळी मुंबईला करण्याची घोषणा झाल्यामुळे गोरेवाडा सफारीचा वेग मंदावला आहे. सफारी योजनेच्या डिझाईनमध्ये बदल केल्याने वेळ लागणार असल्याचे वक्तव्य अधिकारी करीत असले तरी, अधिवेशनाच्या स्थानबदलाचा परिणाम नाकारता येत नाही.गोरेवाडातील इंडियन सफारी भागीदारीतून विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. याअंतर्गत जानेवारी २०१८ मध्ये मुंबईतील ‘एक्सेल वर्ल्ड’ या कंपनीशी करार करण्यात आला आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने आफ्रिकन व इतर सफारी योजनांची कामे सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनाआधी गोरेवाडा इंडियन सफारीचे काम नोव्हेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे दावे केले जात होते. मात्र हे दावे कमकुवत ठरले आहेत. जुलैच्या मुसळधार पावसामुळे सफारी क्षेत्रातील निर्माणाधीन इमारतींचे केवळ प्लास्टरचे काम होत असून, हे कामही सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता दिसून येत नाही. हिवाळी अधिवेशन मुंबईला होत असल्याने सफारीच्या योजनेला ब्रेक लागताना दिसत आहे.

सफारीसाठी हवे १० वाघसूत्रानुसार इंडियन सफारीसाठी चार वाघ आणि सहा वाघिण असे १० वाघ ठेवण्याची योजना आहे. याशिवाय अधिक संख्येने बिबट ठेवण्यात येणार आहेत. सध्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये ५ वाघ आणि २० बिबट आहेत. या वन्यप्राण्यांच्या प्रदर्शनासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा(नवी दिल्ली)ची परवानगी आवश्यक आहे. याशिवाय अन्य प्राणिसंग्रहालयातून वाघ आणण्यासाठीही प्राधिकरणाकडे मागणी करून मान्यता मिळविणे आवश्यक आहे.

प्रस्ताव बघावा लागेलकेंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य बी.के. गुप्ता यांनी सांगितले की, इंडियन सफारीसाठी वाघ आयात करणे व प्रदर्शनासाठी आवश्यक परवानगी प्राधिकरणाकडून घ्यावी लागेल. सध्या गोरेवाडा वन्यजीव केंद्राकडून अशाप्रकारचा प्रस्ताव आला की नाही, हे बघावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमचे प्रयत्न सुरूगोरेवाड्याचे विभागीय प्रबंधक व प्रकल्प नियंत्रक नंदकिशोर काळे यांनी सांगितले की, इंडियन सफारीसाठी बाहेरचे राज्य व इतर प्राणिसंग्रहालयातून वाघ व इतर वन्यप्राणी आणण्यासाठी प्राधिकरणाकडे परवानगी घेतली जाईल. आम्ही डिसेंबरपर्यंत सफारीचे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Gorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालय