शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ब्राव्हो! नागपूर विद्यापीठाला मिळाला ‘अ’ दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 20:13 IST

‘नॅक’च्या (नॅशनल असेसमेन्ट ॲण्ड ॲक्रेडिटेशन कौन्सिल) परीक्षेत नागपूर विद्यापीठाने बाजी मारली असून ‘अ’ दर्जा मिळविण्यात यश मिळविले आहे. सलग दुसऱ्यांना विद्यापीठाला ‘अ’ दर्जा मिळाला आहे.

ठळक मुद्दे‘नॅक’च्या परीक्षेत प्रशासन उत्तीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी मंगळवारचा दिवस अतिशय सुखद ठरला. ‘नॅक’च्या (नॅशनल असेसमेन्ट ॲण्ड ॲक्रेडिटेशन कौन्सिल) परीक्षेत विद्यापीठाने बाजी मारली असून ‘अ’ दर्जा मिळविण्यात यश मिळविले आहे. सलग दुसऱ्यांना विद्यापीठाला ‘अ’ दर्जा मिळाला आहे. वाढत्या रिक्त जागा, कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्या यांवर मात करूनदेखील विद्यापीठाने दर्जा कायम राखला हे विशेष. (Bravo! Nagpur University gets ‘A’ status)

‘नॅक’ समितीने २ ते ४ सप्टेंबरदरम्यान विद्यापीठाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी विद्यार्थी, संशोधक, माजी विद्यार्थ्यांशीदेखील संवाद साधला होता. विद्यापीठातील विविध पदव्युत्तर विभागांतील प्रगतीचा आलेख, संशोधनकार्य, इत्यादींबाबत बारीकसारीक बाबींची चिकित्सा केली होती.

‘नॅक’ समिती पाहणी करून गेल्यानंतर आठवड्यभरात विद्यापीठाच्या श्रेणीबाबत माहिती कळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र अनपेक्षितपणे केवळ चारच दिवसांत ‘नॅक’चा निकाल विद्यापीठाला कळला.

काणे, चौधरी, येवले ‘हिट’

गेल्या काही वर्षांमध्ये माजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, माजी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, तसेच विद्यमान कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी विद्यापीठात सकारात्मक बदल घडवून आणले होते. विशेषत: संशोधन आणि दर्जावर त्यांचा जास्त भर होता. कोरोनाच्या कालावधीतदेखील विद्यापीठातील पीएच.डी.चे वायव्हा ऑनलाईन घेण्यात आले. शिवाय डॉ. चौधरी यांच्या नेतृत्वात ऑनलाईन परीक्षांमध्ये विद्यापीठानेच सर्वांत चांगली कामगिरी केली.

रंगीत तालमीचा झाला फायदा

कुठल्याही परिस्थितीत यंदा ‘अ’ श्रेणी मिळावी यासाठी प्रशासनाने जोरदार प्रयत्न केले होते. ‘नॅक’च्या दौऱ्यासाठी सादरीकरणाचा ‘रोड मॅप’ तयार करण्यात आला. शिवाय काही आठवड्यांअगोदर तज्ज्ञ मंडळींचा समावेश असलेल्या समितीच्या उपस्थितीत रंगीत तालीमदेखील झाली होती. समितीसमोर विभागाचे जास्तीत जास्त चांगले सादरीकरण कसे होईल, समितीसमोर कसे बोलायचे इत्यादी मुद्द्यांवर विभागप्रमुखांना तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात आले होते. प्रत्येक विभागात ‘पॉवरपॉइंट’ सादरीकरण देण्यात आले होते. संबंधित समितीने ज्या त्रुटी समोर आणल्या, त्या दूर करून प्रत्यक्ष ‘नॅक’समोर विद्यापीठाने परीक्षा दिली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ