शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  सराफा दुकानात धाडसी चोरी : रोख रकमेसह १५ लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 23:17 IST

कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा मार्गावर आजूबाजूला असलेल्या सराफा व कपड्याच्या दुकानात शिरून चोरट्यांनी रोख रकमेसह १५ लाखांचा ऐवज लंपास केला.

ठळक मुद्देचोरट्यांनी बाजूच्या कापड दुकानाला आगही लावली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा मार्गावर आजूबाजूला असलेल्या सराफा व कपड्याच्या दुकानात शिरून चोरट्यांनी रोख रकमेसह १५ लाखांचा ऐवज लंपास केला. जाता जाता चोरट्यांनी कपड्याच्या दुकानात आगही लावून दिली. ही धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे ३ वाजता सुमारास घडली. दुकान मालकाला वेळीच जाग आल्याने मोठा अनर्थ टळला.भरतवाडा मार्गावरील न्यू हनुमान नगरात गजानन पुरुषोत्तम तिनखेडे यांचे सराफा आणि बाजूलाच कपड्याचे दुकान आहे. लॉकडाऊनमुळे ही दुकाने बंदच आहेत. मात्र, वरच्या माळ्यावरच दुकान मालक राहत असल्याने तिनखेडे यांचे दोन्ही दुकानांवर लक्ष राहते. आज पहाटे ३ च्या सुमारास कपडे जळाल्याचा वास येत असल्याने त्यांच्या पत्नीने त्यांना उठविले. त्यांनी शयनकक्षाचे दार उघडून बघण्याचा प्रयत्न केला असता ते दार बाहेरून लावल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिनखेडे यांनी गॅलरीतून खाली उडी मारली आणि आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. पोलीस आणि अग्निशमन दलालाही सूचना दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेच आग आटोक्यात आणली. दरम्यान, तिनखेडे आणि पोलिसांनी सराफा दुकानात पाहणी केली असता चोरट्यांनी बनावट चावीने सराफा दुकानाचे कुलूप उघडून आत मधील रोख ४० हजार तसेच विविध ग्राहकांनी तिनखेडे यांच्याकडे गहाण ठेवलेले १४ लाख, ३८ हजार, २०० रुपयांचे दागिने चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.चोरट्यांनी कपड्याच्या दुकानाला आग लावण्यापूर्वी तिनखेडे यांच्या घराचे दार बाहेरून बंद केले होते. सुदैवाने आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने आणि तिनखेडे यांनी प्रसंगावधान राखत खाली उडी मारुन शेजाऱ्­यांना गोळा करून आपले दार उघडून परिवारातील सदस्यांना बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त असताना ही घटना घडल्याने कळमना परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर