शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये धाडसी चोरी

By admin | Updated: January 5, 2015 00:46 IST

गिट्टीखदान आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या दोन घटना घडल्या. पहिल्या घटनेत चोरट्याने धावत्या बसमधून तीन लाखांचे दागिने लंपास केले. तर दुसऱ्या घटनेत एका व्यक्तीच्या

तीन लाखांचे दागिने लंपास : चोरट्यांची हातचलाखी नागपूर : गिट्टीखदान आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या दोन घटना घडल्या. पहिल्या घटनेत चोरट्याने धावत्या बसमधून तीन लाखांचे दागिने लंपास केले. तर दुसऱ्या घटनेत एका व्यक्तीच्या बॅगमधून ३० हजारांची रोकड अन् मोबाईल काढून घेतला. दाभा येथील जयश्री विनोद बारई (वय ३९) या ३१ डिसेंबरला दुपारी ४ वाजता बहिणीच्या लग्नासाठी भंडारा येथे जायला निघाल्या. गिट्टीखदान परिसरातून त्या भंडारा ते नागपूर बसमध्ये बसल्या. धावत्या बसमध्ये त्यांच्या सुटकेसमधून चोरट्याने बेमालुमपणे तीन लाखांचे दागिने लंपास केले. रात्री १० वाजता ही घटना उघडकीस आली. जयश्री बारई यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. विनायक उद्धवराव जोशी (वय ५७, रा. गणेशगौरी अपार्टमेंट, कोतवालनगर) हे शनिवारी रात्री फुले मार्केट गणेशपेठमध्ये भाजीपाला घेत होते. श्रीराम किराणा दुकानाजवळ चोरट्यांनी त्यांच्या बॅगमधील ३० हजारांची रोकड आणि २२ हजारांचा मोबाईल लंपास केला. जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.बसवर दगडफेक चालकाला मारहाण बसवर दगडफेक करून बसचालकाला मारहाण करणाऱ्या अली खान अहमद खान (वय ४२) आणि त्याच्या तीन साथीदारांवर गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हे दाखल केले. सतीश अशोकराव कदम (वय २५, रा. काटोल रोड,नागपूर) हे आज सकाळी ११ वाजता काटोलहून नागपूरला प्रवासी बस घेऊन येत होते. गिट्टीखदान हद्दीत काटोल रोड, आयबीएम रोड, हनुमान मंदिराजवळ (वाजपेयी आॅटो सर्व्हिसच्या बाजूला) एका दुचाकी चालकाचे संतुलन बिघडल्याने तो बसच्या समोर पडला़ त्यामुळे आरोपी अली खान आणि त्याच्या तीन साथीदारांनी बस पुढे नेण्यास मज्जाव केला. एवढेच नव्हे तर कदम यांना मारहाण करून बसच्या मागच्या काचेवर दगडफेक केली. या प्रकारामुळे प्रवाशात घबराट निर्माण झाली. कदम यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी अली खान आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.