शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानासाठी भंडाऱ्यातून नागपुरात आणली ‘ब्रेन डेड’ व्यक्ती; दोघांना दृष्टी मिळणार

By सुमेध वाघमार | Updated: February 22, 2024 21:04 IST

अवयवाच्या प्रतिक्षेत मृत्यूच्या दाढेत जगत असलेल्या तीन रुग्णांनाही मिळणार नवे आयुष्य

सुमेध वाघमारे, नागपूर: अवयवदानाचे महत्त्व आता शहरापुरतेच मर्यादित नाही तर ग्रामीण भागातही पोहचले आहे. दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानादेखील समाजभान राखत निर्णय घेतला जात आहे. गुरुवारी भंडाºयात ‘ब्रेन डेड’ झालेल्या व्यक्तीचा अवयवदानासाठी नागपुरात नेण्यासाठी कुटुंबियाने पुढाकार घेतला. यामुळे अवयवाच्या प्रतिक्षेत मृत्यूच्या दाढेत जगत असलेल्या तीन रुग्णांना नवे आयुष्य तर दोघांना दृष्टी मिळणार आहे.

रामदास गणपत सिंगनजुडे, (४९) असे अवयवदात्याचे नाव आहे. लाहोटी, बेला, जि. भंडारा येथील सिंगनजुडे हे व्यवसायाने वाहन चालक आहेत. प्राप्त माहितीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी सिंगनजुडे यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली. भंडाºयातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत झाल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. अचानक झालेल्या या घटनेने त्यांच्या पत्नी मालती, १९ वर्षीय मुलगी, मोठा भाऊ रामदास सिंगनजुडे (६०) यांना मोठा धक्का बसला. डॉक्टरांनी अवयवदान करण्याचा सल्ला दिला. भाऊ रामदास यांनी आपल्या छोट्या भावाला अवयवरुपी जीवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. याची माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) देण्यात आली. परंतु भंडाºयातील कोणत्याच रुग्णालयाला अवयव काढण्याची मंजुरी प्राप्त नाही. यामुळे ‘ब्रेन डेड’ व्यक्तीला नागपुरात आणणे गरजेचे होते. यासाठीही कुटुंबियानी मंजुरी दिली. त्यानुसार गुरुवारी दुपारी नागपुरातील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ‘झेडसीसी’ने नियमानुसार दोन्ही मूत्रपिंड व यकृताचे आणि मेडिकलच्या नेत्ररोग विभागाला कॉर्नियाचे दान के ले.-वयोवृद्ध रुग्णावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ‘झेडसीसी’ने मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ६३वर्षीय पुरुष रुग्णाला एक मूत्रपिंड तर याच वयोगटातील पुरुष रुग्णाला यकृताचे दान केले. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू होती तर, दुसरे मूत्रपिंड किम्स किंग्सवे हॉस्पिटलचा ३० वर्षीय पुरुष रुग्णाला दान करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरbhandara-acभंडारा