शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दुरावा केल्याने संतप्त प्रियकराने स्कार्फने आवळला प्रेयसीचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 15:33 IST

तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने तरुणीने दुरावा करीत त्याच्याशी बोलणे बंद केले. यामुळे, त्याचा राग अनावर झाला होता.

नागपूर : प्रियकर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे समजल्यानंतर तरुणीने त्याच्यापासून दुरावा करीत सर्व प्रकारचे संबंध तोडले. हे प्रियकराला सहन झाले नाही व तो तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या घरी पोहोचला. तरुणीशी वाद घातल्यानंतर त्याने स्कार्फने तिचा गळा आवळला. मात्र, तितक्यात तरुणीचा भाऊ तेथे पोहोचला आणि आरोपीला तेथून पळावे लागले आणि तरुणीचे प्राण वाचले.

ही थरारक घटना कोराडी ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी पिडितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी आदेश दुर्गादास तिरपुडे(वय २३) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

माहितीनुसार, २१ वर्षीय पिडीत तरुणी ही आई-वडील, भाऊ-वहिनी यांच्यासह महादुलाच्या सिद्धार्थनगर परिसरात राहते. तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे आणि गणेशनगर, पांजरा येथील नंदिनी नर्सिंग होम रुग्णालयात ती पारिचारिका आहे. आरोपी आदेश आणि पिडीतेची जुनी ओळख आहे. पूर्वी आदेश पिडितेच्या शेजारीच राहत होता. दरम्यान, त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

आदेश कामधाम करत नव्हता. त्याला चोरीच्या एका प्रकरणात पोलिसांनी अटकही केली होती. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने तरुणीने आदेशपासून दुरावा करीत त्याच्याशी बोलणे बंद केले. यामुळे, आदेशचा तडफडाट झाला. तो तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, तरुणी त्याला प्रतिसाद देत नव्हती. यामुळे रागात फणफणत असलेल्या आदेशने तिला संपवण्याचाच प्लॅन आखला. शुक्रवारी रात्रीच्या वेळी तरुणी घरी एकटीच होती. ही संधी साधत आदेश घरात घुसला. त्याने तिला मारहाण करत विनयभंग करून तिच्या जवळच्या स्कार्फच्या सहाय्याने छताच्या लोखंडी पाइपला बांधून ठार मारण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, शेजारी राहणाऱ्या चुलत भावाला घरात काही आवाज ऐकू येत असल्याने शंका आली. सदर प्रकार लक्षात येताच तरुणीच्या घरी गेला. त्यामुळे आदेशने घरातून पळ काढला. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आद्याचा शोध सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी