शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

बोर्इंगचा आशिया-पॅसिफिकवर ‘फोकस’

By admin | Updated: August 21, 2016 03:21 IST

नागरी उड्ड्यण क्षेत्राची दरवर्षी जवळपास २७ टक्क्यांनी वाढ होत आहे. ४० टक्क्यांपेक्षा जास्त मागणी आशिया-पॅसिफिक

दिनेश केसकर यांची माहिती : अटीनुसार एमआरओ व वैमानिक प्रशिक्षण स्कूलची स्थापनानागपूर : नागरी उड्ड्यण क्षेत्राची दरवर्षी जवळपास २७ टक्क्यांनी वाढ होत आहे. ४० टक्क्यांपेक्षा जास्त मागणी आशिया-पॅसिफिक क्षेत्रातून असल्यामुळे बोर्इंगने या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केल्याची माहिती बोईंगच्या आशिया पॅसिफिक अ‍ॅन्ड इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री) डॉ. दिनेश केसकर यांनी शनिवारी लोकमतशी बोलताना दिली. ‘वाईल्ड-बॉडीज’मध्ये बोर्इंग अग्रणीडॉ. केसकर म्हणाले, आशिया पॅसिफिकमध्ये चार वैमानिक (वाईल्ड-बॉडीज) असलेल्या विमानाच्या निर्मितीत बोर्इंग अग्रस्थानी तर दोन वैमानिक (नॅरो-बॉडीज) असलेल्या विमानांच्या निर्मितीत बोर्इंगचा ५० टक्के वाटा आहे. ‘वाईल्ड-बॉडीज’ वर्गवारीत जेट एअरवेज, एअर इंडिया, अमिरात, सिंगापूर एअरलाईन्स तर ‘नॅरो-बॉडीज’ वर्गवारीत इंडिगो, स्पाईस, स्पाईस जेट, जेट एअर, थायर एअरवेज, क्वॉन्टास एअरवेज हे मुख्य ग्राहक आहेत. ‘वाईल्ड-बॉडीज’मध्ये बी-७७७-एलआर आणि बोर्इंग ७७७-३०० ईआर या विमानांचा समावेश आहे. दोन्ही विमानांची प्रवासी क्षमता २४० ते ३१० एवढी आहे. भारताच्या कोणत्याही शहरातून उड्डाण भरल्यानंतर न थांबता सिडनी (आॅस्ट्रेलिया) आणि न्यू जर्सी (अमेरिका) येथे पोहोचू शकते. याशिवाय ‘नॅरो-बॉडीज’ वर्गवारीत बोर्इंगच्या बी-७८७-८, बी-७८७-९ आणि ७३७-८०० या विमानांचा समावेश असून प्रवासी क्षमता १४५ ते १८५ एवढी असल्याचे डॉ. केसकर यांनी स्पष्ट केले.अटीनुसार एमआरओ व वैमानिक प्रशिक्षण स्कूलविमान विकताना पूर्वअटीनुसार बोर्इंगने नागपुरातील मिहानमध्ये एमआरओ आणि मुंबईतील सांताक्रूझ एअरबेस येथे वैमानिक स्कूलची स्थापना केली. दोन्ही सुविधा कार्यान्वित झाल्या असून एअर इंडियाला हस्तांतरित केल्या आहेत. एमआरओमध्ये प्रत्येक तीन वर्षांनंतर विमानांची तपासणी (सी-चेक) आणि विमानातील सुट्या भागांची पुनर्जुळणी (डी-चेक) या सुविधा आहे. स्कूलमध्ये ४०० वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे केसकर यांनी सांगितले. बोर्इंगकडे ५५०० विमानांची आॅर्डरबोर्इंग ‘वाईल्ड बॉडीज’ मोठे विमान अर्थात ए-३८० सारखे विमान बनविण्यास अनुकूल नाही. कारण या विमानांची प्रवासी संख्या ८०० एवढी असल्यामुळे असे विमान पूर्ण क्षमतेने उड्डाण भरत नाही. काहीच कंपन्यांची या विमानाला पसंती आहे. त्यामुळे बोर्इंगची पूर्ण क्षमतेने उड्डाण भरणाऱ्या विमानांना पसंती असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी बोर्इंगने विभिन्न विमान कंपन्यांना ७३५ विमाने विकली आहेत. सध्या कंपनीकडे ५५०० विमानांची आॅर्डर आहेत. भारतात नागरी उड्ड्यण हब म्हणून उदयास येण्याची नागपुरात क्षमता आहे. हे बोर्इंगने तयार केलेल्या एमआरओने सिद्ध होणार असल्याचे डॉ. केसकर म्हणाले.