शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर लागणार बॉटल क्रशिंग मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 11:13 IST

नागपूर रेल्वेस्थानकावर बॉटल क्रशिंग मशीन लावण्यात येणार असून या मशीनच्या साहाय्याने प्लास्टिकच्या बॉटल क्रश करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देरेल्वेचा ‘इकोफ्रेंडली’ प्रकल्पप्लास्टिकच्या कचऱ्याला बसणार आळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. यात पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बॉटल्सची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे या कचऱ्याला आळा घालण्यासाठी लवकरच विविध विभागांच्या सहकार्याने रेल्वेस्थानकावर बॉटल क्रशिंग मशीन लावण्यात येणार आहेत.दूषित पाण्यामुळे अनेक आजार होत असल्यामुळे अनेक प्रवासी पिण्याच्या पाण्याची बाटली विकत घेतात. नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वेने परवानगी दिलेल्या अनेक कंपन्यांचे बाटलीबंद पाणी विकण्यात येते.याशिवाय वॉटर व्हेंडींग मशीनवरही पाण्याच्या बाटल्यांची विक्री करण्यात येते. बॉटलमधील पाणी संपल्यावर अनेक प्रवासी या बॉटल रेल्वे रुळावर, रिकाम्या जागी, डस्टबिनमध्ये फेकून देतात. अनेकदा या बॉटल नालीत अडकल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे या समस्येपासून दिलासा मिळावा यासाठी रेल्वेस्थानकावर बॉटल क्रशिंग मशीन लावण्यात येणार असून या मशीनच्या साहाय्याने प्लास्टिकच्या बॉटल क्रश करण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिका, कॉनकोर कंपनी आणि रेल्वेकडून या बॉटल क्रशिंग मशीनची व्यवस्था करण्यात येणार आहे.

रिकाम्या बॉटल्सचा होणार नाही पुनर्वापररेल्वेस्थानकावर अनेक असामाजिक तत्त्व रेल्वे प्रशासनाची नजर चुकवून प्रवाशांनी फेकलेल्या रिकाम्या पाण्याच्या बॉटलमध्ये पुन्हा पाणी भरून त्याची कमी दराने विक्री करतात. कमी दरात या पिण्याच्या पाण्याच्या बॉटल मिळत असल्यामुळे अनेक प्रवासी या बॉटल्सची खरेदी करतात. परंतु आता बॉटल क्रशिंग मशीन लागल्यामुळे या रिकाम्या बॉटल्सचा पुनर्वापर करण्यावर अंकुश येणार आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर