शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

दोघांना जन्मठेप - नऊ जण निर्दोष

By admin | Updated: September 25, 2014 01:33 IST

बहुचर्चित राजकमल चौक खून खटल्यात बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर अन्य नऊ आरोपींची सबळ पुराव्याअभावी

न्यायालय : राजकमल चौक खून खटलानागपूर : बहुचर्चित राजकमल चौक खून खटल्यात बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर अन्य नऊ आरोपींची सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका केली. सुमित रमेश चिंतलवार(२५)रा. विश्वकर्मानगर आणि अमर ऊर्फ छोटू रमेश लोहकरे (२५) रा. बजरंगनगर, अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश ऊर्फ पिंकू मारोती घोंगडे (२६) रा. रघुजीनगर पोलीस क्वॉर्टर, असे मृताचे नाव होते. निर्दोष सुटका झालेल्यांमध्ये शुभम ऊर्फ बबलू मनोहर फुलझेले (२२) रा. रामबाग, श्रीकांत ऊर्फ मामा चिंतामण इंगोले (३०) रा. बजरंगनगर, अमर नामदेव धरमारे(२८) रा. ज्ञानेश्वरनगर, प्रवीण ऊर्फ जॉन पूरण कालिंदी (२६) रा. वसंतनगर झोपडपट्टी, सॅबेस्टियन ऊर्फ शिबू राफेल अँथोनी (२२) रा. इंदिरानगर जाटतरोडी, रितेश रमेश सेलोकर (२३) रा. जाटतरोडी, निशांत ऊर्फ गब्बर चंद्रकांत सहारे (२८) रा. कुकडे ले-आऊट,ललित ऊर्फ लाडी विलास ठाकरे (२४) रा. विश्वकर्मानगर आणि प्रवीण महादेव मुरारकर (२६) रा. इमामवाडा यांचा समावेश आहे. थरारक सूडनाट्यसरकार पक्षानुसार या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, धंतोली संगम चाळसमोरून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवरून एप्रिल २०११ मध्ये बबलू सहारे आणि राजू कांबळे या दोघांचा खून करण्यात आला होता. या खुनात पिंकू घोंगडे हा आरोपी होता.आपल्या मित्रांच्या खुनाचा सूड म्हणून सुमित चिंतलवार आणि साथीदारांनी १० आॅगस्ट २०११ रोजी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास राजकमल ते जादूमहल चौकादरम्यानच्या श्रद्धा अपार्टमेंटसमोर पिंकू घोंगडे याचा तलवार, चाकू, चॉपरने हल्ला करून आणि दगडाने ठेचून निर्घृण खून केला होता. त्याच्यावर शस्त्रांचे ४८ घाव होते. घटनेच्या वेळी पिंकूची एका जुन्या प्रकरणात न्यायालयात तारीख होती. त्यामुळे तो आपला भाऊ राजेश घोंगडे याच्या सोबत जात होता. दोघेही वेगवेगळ्या मोटरसायकलींवर होते. न्यायालयाकडे जाण्यापूर्वी हे दोघे चंद्रमणीनगर येथील आपली बहीण सोनू अनिल पाटील हिला भेटण्यासाठी जात असतानाच सुमित चिंतलवार याने श्रद्धा अपार्टमेंटसमोर आवाज देऊन पिंकूला थांबवले होते. त्यानंतर सुमित आणि इतरांनी पिंकूला घेराबंदी करून त्याचा खून केला होता. राजेश घोंगडे याच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी भादंविच्या ३०२, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब), शस्त्र कायद्याच्या ४/२५ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या १३५ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. १२ आॅगस्ट २०११ रोजी या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक पी. एच. बडा यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी २ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले. रासायनिक परीक्षणात आरोपींच्या कपड्यांवरील मृताचे रक्त जुळले होते.फरारच राहिला नयनया खून प्रकरणात एक महत्त्वाचा आरोपी नयन दादाजी चिंतलवार हा फरारच राहिला. तो मुख्य आरोपी सुमित चिंतलवार याचा पुतण्या आहे. नयनला त्यावेळचे तदर्थ न्यायालयाचे न्यायाधीश दुनेदार यांच्या न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. या आदेशाविरुद्ध सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने सत्र न्यायालयाचा जामिनाचा आदेश रद्द केला होता. या आरोपीला अटक झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध वेगळा खटला चालेल. अशी आहे शिक्षा न्यायालयाने सुमित चिंतलवार आणि अमर लोहकरे यांना भादंविच्या ३०२, १४९ कलमांतर्गत जन्मठेप, २ हजार रुपये दंड, १४७ कलमांतर्गत ६ महिने कारावास, ५०० रुपये दंड, १४८ कलमांतर्गत १ वर्ष कारावास, ७५० रुपये दंड, शस्त्र कायद्याच्या कलम ४/२५ अंतर्गत १ वर्ष कारावास, ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा आरोपींना एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयाने या सर्व आरोपींची गुन्हेगारी कट (भादंवि १२०-ब) यातून निर्दोष सुटका केली. न्यायालयात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे, आरोपींच्या वतीने अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे, अ‍ॅड. आर. के. तिवारी, अ‍ॅड. राम मासूरके आणि अ‍ॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले. सरकार अपिलात जाणारनिर्दोष सुटलेल्या आरोपींपैकी शुभम फुलझेले, प्रवीण कालिंदी, श्रीकांत इंगोलेविरुद्ध सरकार उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचे सरकार पक्षाकडून सांगण्यात आले.(प्रतिनिधी)