शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या मेडिकलमधील एसीबीच्या सापळ्यात महिला डॉक्टरसह दोघे अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:24 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील एका रुग्णाकडून तीन हजार रुपयाची लाच घेताना सोमवारी एका कनिष्ठ डॉक्टरसह महिला डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. रात्री ही कारवाई झाल्याने महिला डॉक्टरला मंगळवारी ताब्यात घेतले जाणार आहे. या कारवाईने मेडिकलमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देडोळ्यात इंजेक्शन लावण्यासाठी मागितले तीन हजार रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील एका रुग्णाकडून तीन हजार रुपयाची लाच घेताना सोमवारी एका कनिष्ठ डॉक्टरसह महिला डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. रात्री ही कारवाई झाल्याने महिला डॉक्टरला मंगळवारी ताब्यात घेतले जाणार आहे. या कारवाईने मेडिकलमध्ये खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, २३ जानेवारी रोजी ४७ वर्षीय तक्रारकर्ता आपल्या पत्नीला घेऊन मेडिकलच्या नेत्ररोग विभागात आला. मधुमेहामुळे त्याच्या पत्नीच्या रेटीनाला सूज आली होती. डॉक्टरांनी तपासून त्यांना पुन्हा येण्यास सांगितले. पुन्हा उपचारासाठी आल्यावर डॉक्टरांनी रेटीनाची सूज कमी करण्यासाठी ‘अवॅस्टींज’ नावाचे इंजेक्शन लिहून दिले. या इंजेक्शनची एका व्हायलची किंमत बाजारात २४ हजाराच्या घरात आहे. याशिवाय या व्हायलचे आठ भाग करता येतात; शिवाय मेडिकलच्या ‘रेट कॉन्ट्रॅक्ट’मध्ये हे इंजेक्शन नसल्याने रुग्णालयात ते उपलब्ध राहत नाही. अनेक गरीब रुग्णांना २४ हजाराचे इंजेक्शन घेणे परडवत नसल्याने तेच डॉक्टरांना यातून मार्ग काढण्यास सांगतात. यावर उपाय म्हणून नेत्ररोग विभागाचे डॉक्टर हे इंजेक्शन विकत आणून त्याचे आठ भाग करून गरजू रुग्णांकडून तीन हजार रुपये घेऊन देतात. परंतु यासाठी त्या रुग्णाची संमती घेतात. याच प्रकारातून नेत्ररोग विभागातील कनिष्ठ डॉक्टर स्वानंद प्रधान (२६) व सहायक प्राध्यापक डॉ. वंदना अय्यर (३५) यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली. तक्रारकर्त्यांनी पैशाची व्यवस्था करण्यासाठी काही दिवस मागितले आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यानुसार २८ जानेवारी रोजी तक्रारकर्त्याने पत्नीला नेत्ररोग विभागाच्या वॉर्डात भरती केले. डॉक्टरांकडून इंजेक्शनसाठी तीन हजार रुपयांची मागणी करून पैसे ठेवून घेत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतले; नंतर महिला डॉक्टरला सोडून मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजर राहण्यास सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरCorruptionभ्रष्टाचार