शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यासह दोघांनी लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 20:46 IST

महापालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्यांसह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. सीताबर्डी आणि यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी या घटना घडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्यांसह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. सीताबर्डी आणि यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी या घटना घडल्या. धरमपेठ मधील आंबेडकर नगरात राहणारे रजनीश राजेश गौरे (वय ३७) यांनी बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास सिलिंग फॅनला दुपट्टा बांधून गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळताच सीताबर्डीचा पोलीस ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी गौरे यांचा मृतदेह मेडिकलला पाठविला. रजनीश गौरे हे महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली ते गुरुवारी दुपारपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.अशाच प्रकारे यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिपू सुलतान चौकाजवळ राहणाºया आसमाबी मोहम्मद जाबीर अन्सारी (वय ५५) या महिलेने गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. आसमाबी यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. यासंबंधाने चौकशी सुरू असल्याची माहिती यशोधरा नगर पोलिसांनी सांगितली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारीSuicideआत्महत्या