शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
4
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
5
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
6
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
7
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
8
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
9
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
10
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
11
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
12
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
13
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
14
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
15
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
16
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
17
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
18
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
19
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
20
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई

दोघांचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: February 13, 2015 02:25 IST

हुडकेश्वर भागातील राजापेठ बस थांब्यासमोरील बहुचर्चित क्रिकेट बुकी खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने ...

नागपूर : हुडकेश्वर भागातील राजापेठ बस थांब्यासमोरील बहुचर्चित क्रिकेट बुकी खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने दोन आरोपींचा जामीन अर्ज गुरुवारी फेटाळून लावला. राहुल मधुकर गणवीर (२५) रा. चंदननगर आणि आशिष दिलीप काळे (२७) रा. चैतन्यनगर खरबी, अशी आरोपींची नावे आहेत. शितल श्यामराव राऊत (४०) रा. दुबेनगर, असे मृताचे नाव होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीकांत ऊर्फ चिंगा थोरात(२४) रा. बापूनगर , त्याचे साथीदार राजू ऊर्फ बल्ली शेंडे , राजेश ऊर्फ राजू अण्णा मस्के , रोशन ऊर्फ गोट्या मोहिते , राहुल गणवीर आणि आशिष काळे, अशा एकूण सहा जणांनी १५ डिसेंबर २०१४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास राजापेठ बसथांब्यानजीकच्या प्रिन्स पानठेल्यासमोर शितल राऊत याला घेराबंदी केली होती. चाकूने भोसकून, कुऱ्हाडीने घाव घालून आणि दगडाने ठेचून त्याचा घटनास्थळीच निर्घृणपणे खून केला होता. शितलचा भाऊ संजय श्यामराव राऊत (४६) याच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी भादंवि ३०२, १४३, १४८, १४९, २०१, १२० (ब) आणि शस्त्र कायद्याच्या ४/२५ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. श्रीकांत थोरातसह चार जणांना १६ डिसेंबर तर राहुल गणवीरसह दोन जणांना १७ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. मुख्य आरोपी श्रीकांत थोरात याच्या कबुलीनुसार तो मृताचा पुतण्या कुणाल याच्याकडे एप्रिल २०१४ मध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यावर उधारीत सट्टा खेळून १० लाख रुपये हरला होता. त्यापैकी ४ लाख रुपयांची त्याने वेळोवेळी परतफेड केली होती. ६ लाख रुपये बाकी होते. शितल हा ‘तुझी किडनी विकून पैसे वसूल करील’, अशी धमकी श्रीकांतला देत होता. परिणामी श्रीकांतने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याचा निर्घृण खून केला होता. आरोपींपैकी राहुल आणि आशिष यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर युक्तिवाद झाला. हे आरोपी जामीन मिळून प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर दबाव टाकतील, म्हणून त्यांचा जामीन फेटाळण्यात यावा, अशी विनंती सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील उषा गुजर यांनी केली. त्यांचे म्हणणे ग्राह्य धरून न्यालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. पी. इंगळे हे आहेत. (प्रतिनिधी)