शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या प्रकल्पांना मिळणार ‘बूस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:34 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा, नदीविकास व गंगा स्वच्छता मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ठळक मुद्देनितीन गडकरींकडून अपेक्षा : केंद्राकडून १० हजार कोटींचा निधी प्रलंबित

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा, नदीविकास व गंगा स्वच्छता मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गडकरींच्या कामाचा धडाका लक्षात घेता राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना निश्चितच ‘बूस्ट’ मिळेल. विशेषत: पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील २६ प्रकल्पांचे काम आणखी वेगाने होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.सिंचन घोटाळ्यामुळे हादरा बसल्यानंतर जलसिंचन प्रकल्पांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत होता. देशातील रखडलेले राष्ट्रीय सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने विशेष प्रयत्न सुरू केले. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सिंचन प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण व्हावेत यासाठी विशेष ‘मिशन’ राबविण्यात येत आहे. अगोदर ‘एआयबीपी’मध्ये (अ‍ॅस्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम) समाविष्ट असलेल्यांसह राज्यातील २६ प्रकल्पांचा यात समावेश करण्यात आला आहे. नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनंतरच हे प्रकल्प या योजनेत समाविष्ट झाले होते.यातील बहुतांश प्रकल्पांचे काम १५ ते २० वर्षांअगोदर सुरू झाले होते. मात्र आता त्यांची बांधकाम किंमत अनेक पटींनी वाढली आहे. त्यामुळे सहाजिकच निधीचा प्रश्न नेहमीच उभा राहतो. सद्यस्थितीत या प्रकल्पांना एकूण १८६५४ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यात केंद्र शासनाचा वाटा हा १० हजार ६१५ कोटी ६२ लाख ९० हजार इतका आहे. आता गडकरींकडेच जलसंपदा मंत्रालयाची धुरा आल्यामुळे या रखडलेल्या प्रकल्पांना निधीची कमतरता जाणवणार नाही व राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन लवकरात लवकर सिंचनाखाली येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.‘गोसेखुर्द’ला मिळणार नवसंजीवनी‘गोसेखुर्द’ प्रकल्पासंदर्भात माजी मंत्री उमा भारती यांच्याकडून फारशी ठोस पावले उचलण्यात आली नव्हती. हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होईल हे सांगणे शक्य नाही, असे वक्तव्यदेखील त्यांनी केले होते. १९८१ साली सुरू झालेल्या या प्रकल्पाच्या उभारणीची अंदाजित किंमत ३७२ कोटी इतकी होती. आता ती १८ हजार कोटींहून अधिक झाली आहे. आतापर्यंत सुमारे ९ हजार ५ कोटी यावर खर्च झाले आहेत. गडकरी यांच्या पुढाकारातून या प्रकल्पाला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे...तर विदर्भाचे चित्र बदलेलविदर्भातील गोसेखुर्द व बेंबळा हे दोन महत्त्वाचे प्रकल्प या योजनेत आहेत. गोसेखुर्दमुळे तर अडीच लाख हेक्टर जमीन सिंचनक्षेत्रात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांमुळे विदर्भाचे चित्र बदलण्याची क्षमता आहे. नितीन गडकरी यांचा सिंचन प्रकल्पांचा अभ्यास आहे. शिवाय त्यांना या प्रकल्पांचे महत्त्वदेखील माहीत आहे. मंत्री नसतानादेखील ते या प्रकल्पांच्या निधीसाठी प्रयत्नरत होते. आता ते स्वत:च या विभागाचे मंत्री झाले आहे. त्यांच्या कामाची शैली पाहता हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, असे मत ‘जनमंच’चे अध्यक्ष व सिंचन प्रकल्पांचे अभ्यासक अ‍ॅड.अनिल किलोर यांनी व्यक्त केले.