शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

काटोलच्या संत्रा प्रक्रिया प्रकल्पाला बूस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 03:13 IST

काटोल-नरखेड या संत्रा उत्पादक भागात पतंजली योगपीठातर्फे स्वामी रामदेवबाबा यांच्या पुढाकाराने काटोल येथे संत्रा उत्पादन प्रक्रिया कारखाना उभारणार असून ...

पतंजली योगपीठाला २०० एकर जागा : गडकरी यांनी घेतली आढावा बैठक नागपूर : काटोल-नरखेड या संत्रा उत्पादक भागात पतंजली योगपीठातर्फे स्वामी रामदेवबाबा यांच्या पुढाकाराने काटोल येथे संत्रा उत्पादन प्रक्रिया कारखाना उभारणार असून त्यासाठी एमआयडीसीची २०० एकर जागा ताब्यात घेणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संयुक्त पत्रपरिषदेत दिली.काटोलप्रमाणेच अमरावतीतही पतंजली योगपीठ जागा घेणार आहे. या संदर्भातील एक आढावा बैठक केंद्रीय रस्ते व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने झाली. या बैठकीला पतंजली पीठातर्फे आचार्य बाळकृष्णन, खासदार कृपाल तुमाने, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार अनिल सोले, आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. आशिष देशमुख, महापौर प्रवीण दटके, मल्लिकार्जुन रेड्डी, विकास कुंभारे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व विविध विभागाचे सचिव उपस्थित होते.काटोलचा संत्रा प्रक्रिया कारखाना १९९७ मध्ये सुरू झाला होता. फेब्रुवारी १९९७ ते मे २००१ पर्यंत प्रकल्प सुरू होता. त्यावेळी ११.४७ कोटी रुपये खर्च या प्रकल्पावर झाला. शासन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने संयुक्तपणे हा प्रकल्प सुरू केला होता. कालांतराने महामंडळाने मे. अलायन्स अ‍ॅग्रो इंडिया प्रा. लि. यांच्याशी करार करून त्यांना चालविण्यास हा कारखाना हस्तांतरित केला. २००१ नंतर हा प्रकल्प बंद पडला.काटोलच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या संत्रा कारखान्यासाठी पतंजली योगपीठाला वीज व पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे काटोल-नरखेड-अमरावती या भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्र्याला चांगली किंमत मिळणार आहे.शेतकऱ्यांना दिलासा नागपूर : मोठ्या प्रमाणात होणाऱ्या संत्रा उत्पादनाला या कारखान्यामुळे चांगले दिवस येतील. संत्र्यापासून निर्माण होणारी विविध प्रकारची शुद्ध उत्पादने या भागातील नागरिकांना उपलब्ध होतील. स्वामी रामदेवबाबा आणि केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. नितीन गडकरी यांनी स्वामी रामदेवबाबा यांना विदर्भ व मराठवाडा या शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात पतजंलीचे उत्पादन सुरू करावे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याची तयारी व्यक्त केली.त्यामुळे स्वामीजींनी या भागात पतंजलीचे उत्पादन असलेले कारखाने सुरू करण्याची तयारी दर्शविली. हा कारखाना व अन्य उपक्रमाने सुमारे १० हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.विदर्भातील वनात २०० प्रकारच्या जडीबुटीयावेळी पतंजली समूहाचे आचार्य बाळकृष्णन यांनी सांगितले की, आयुर्वेदामध्ये एकूण ३०० प्रकारच्या जडीबुटींची आवश्यकता असते. विदर्भ आणि गडचिरोली भागातील वनसंपत्ती पाहता २०० प्रकारची आयुर्वेदिक औषधे येथे उपलब्ध आहेत. तसेच जी औषध या भागात नाहीत त्या औषधांचे उत्पादन येथे होऊ शकते. ते लक्षात घेता त्या भागात विविध औषधे तयार करण्याची व्यवस्था आम्ही करणार. जडीबुटी औषध निमार्णासाठी या भागातील वातावरण पोषक असल्याचेही आचार्य बाळकृष्णन यांनी सांगितले.गडचिरोलीमध्ये होणार ‘अ‍ॅग्रोहॅक ’वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत सांगितले की, राज्यात ७५ टक्के जमीन ही वन विभागाची असून ती जमीन आदिवासी गडचिरोली व इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून एकट्या गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ९० हजार हेक्टर जमीन आहे. या जमिनीवर उपलब्ध असलेल्या वनऔषधींवर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प तयार करून अ‍ॅग्रोहॅक तयार करण्यात येणार आहे. यामध्ये ३२५ औषधांची निर्मिती करण्यात येणार असून त्यामुळे परिसरातील आदिवासी बांधवांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. आदिवासी गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकासावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा लागणार असून यासाठी राज्यात २६५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. पतंजलीचे आचार्य बाळकृष्णन यांनीसुद्धा गडचिरोली येथे औषध निर्मितीचे एक युनिट लावण्यात येईल, तसेच तेथील आदिवासींना प्रशिक्षिण देऊन रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट केले.