शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

जग बदलण्याची इच्छा निर्माण करतात पुस्तके : डॉ. नीलिमा चौहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:12 IST

पुस्तकांमुळे जग बदलण्याची इच्छा आणि शक्ती निर्माण करण्याची क्षमता असते, असे मत दिल्ली विश्वविद्यालयाच्या झाकीर हुसैन दिल्ली कॉलेज (सायं.) च्या सहायक प्राध्यापक व लेखिका डॉ. नीलिमा चौहान यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘कलम : अपनी भाषा, अपने लोग’ कार्यक्रमात मांडले विचारप्रभा खेतान फाऊंडेशनचा उपक्रम, लोकमत व अहसास वूमन ऑफ नागपूरचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुस्तकांमुळे जग बदलण्याची इच्छा आणि शक्ती निर्माण करण्याची क्षमता असते, असे मत दिल्ली विश्वविद्यालयाच्या झाकीर हुसैन दिल्ली कॉलेज (सायं.) च्या सहायक प्राध्यापक व लेखिका डॉ. नीलिमा चौहान यांनी व्यक्त केले.प्रभा खेतान फाऊंडेशनच्यावतीने ‘कलम : अपनी भाषा अपने लोग’ या उपक्रमांतर्गत लोकमत आणि अहसास वूमन ऑफ नागपूर यांच्यावतीने हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे आयोजित लेखक-पाठक संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. समाजातील स्त्रियांच्या अवस्थेबाबत त्यांनी रोखठोक विचार मांडले. महिलांना कौटुंबिक आणि नोकरीपेशा अशा वर्गात विभाजित करणे योग्य नाही. महिलांना स्वातंत्र्य नाही तर बरोबरीचा दर्जा हवा आहे. सर्वत्र एक ठरलेली चौकट आहे. याच चौकटीच्या मर्यादेत लेखन व कार्य करण्याची स्वतंत्रता आहे. मात्र ही चौकट तोडून बाहेर पडले की विरोध सुरू होतो. याला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात संघर्ष करावा लागेल, मनातील भावना पुस्तकात मांडाव्या लागतील, असे विचार डॉ. चौहान यांनी यावेळी व्यक्त केले.अहसास वूमन ऑफ नागपूरच्या सदस्या नीता सिंह यांच्या विविध प्रश्नांना डॉ. चौहान यांनी उत्तर दिले. संचालन परवीन तुली यांनी केले. हॉटेल रेडिसन ब्ल्यूचे सहायक महाप्रबंधक विकास पाल यांनी लेखिकेचा सत्कार केला. यानंतर त्यांनी ‘आफिशियली पतनशील’ हे त्यांचे पुस्तक वाचकांना समर्पित केले. आयोजनात अहसास वूमन ऑफ नागपूरच्या प्रियंका कोठारी, ज्योती कपूर, मोनिका भगवागर आदींचा सहभाग होता.कोणतेही चांगले पुस्तक हे सामूहिक कर्म असते. एखादा धागा या रचनात्मक निर्मितीचे कारण ठरतो. ‘कलम’चे चर्चासत्र रोखठोक आणि माहितीने परिपूर्ण ठरले.प्रियंका कोठारीआजच्या चर्चासत्रात महिलांचे प्रश्न आणि विशेषत: लैंगिकतेच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये मनातील अनेक कुतूहलांचे उत्तर मिळाले. डॉ. चौहान यांनी परिपूर्ण मार्गदर्शन केले.परवीन तुलीचर्चासत्रात डॉ. चौहान यांनी रोखठोकपणे आपले विचार मांडले. महिलांच्या स्थितीबाबत खूप कमी लोक खुल्या मनाने लेखन करू शकतात. हे चर्चासत्र ऊर्जा प्रदान करणारे ठरले.नीता सिंहडॉ. चौहान यांनी अतिशय संवेदनशील विषयावर विचार मांडले. प्रत्येक महिन्याला ‘कलम’चा हा कार्यक्रम होतो. समाजातील अशा विविध विषयांवर चर्चा करणे हा प्रशंसनीय उपक्रम आहे.विकास पाल

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर