७० दिवसांचा रणसंग्राम :४०० बुकी-पंटरचे नेटवर्क नरेश डोंगरे नागपूर ‘रणसंग्रामात’ कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या बुकींनी दक्षिण आफ्रिका आणि भारतादरम्यानच्या ७० दिवसांच्या क्रिकेट संग्रामावर दीड हजार कोटींची खायवाडी करण्याचे टार्गेट फिक्स केल्याची माहिती आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी छोटे, मोठे बुकी आणि पंटर अशा ४०० जणांच्या नेटवर्कला काही भ्रष्ट पोलिसांची साथ जोडून मध्यभारतातील बुकींनी नागपूर व आजूबाजूच्या परिसरात सट्टा बाजार गरम केला आहे.नागपूरचा क्रिकेट सट्ट्याचा बाजार देशविदेशात चर्चेत राहिला आहे. येथील अनेक बुकींचे थेट विदेशात कनेक्शन असून, क्रिकेटच्या रणसंग्रामात ते दर सामन्यावर कोट्यवधींची खयवाडी करून गोवा, बँकॉक, दुबईत कटिंग (उतारी) करतात. दिल्ली पोलिसांनी उघड केलेल्या फिक्सिंगच्या आरोपावरून श्रीशांत, विंदू दारासिंगसह नागपुरातील बुकींवरही गुन्हे दाखल केल्यामुळे येथील बुकी आणि सट्टाबाजाराच्या धक्कादायक नेटवर्कचा खुलासा झाला होता. दरवर्षी आयपीएलमध्ये उपराजधानीतील सट्टा बाजार जबरदस्त उसळी मारतो. नागपुरातील बुकी विदर्भच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातूनही कोट्यवधींची खयवाडी करतात. आयपीएल संपल्यानंतरही प्रत्येकच आंतरराष्ट्रीय सामन्यावर येथील बुकी खयवाडी करतात, याचीही अनेकदा प्रचिती आली. सध्या दक्षिण आफ्रिका आणि भारतादरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट संग्रामात बुकींनी पूर्ण तयारीनिशी डावबाजी सुरू केली आहे.
बुकींचे दीड हजार कोटींचे टार्गेट
By admin | Updated: October 12, 2015 02:48 IST