शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बुकिंग केली उन्हाळ्यात; चारचाकी मिळाली दिवाळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 20:33 IST

Nagpur News दोन वर्षांच्या तुलनेत यंदा वाहन बाजार तेजीत होता. यंदा अपेक्षेपेक्षा जास्त वाहनांची विक्री झाल्याचे विविध कंपन्यांच्या विक्रेत्यांनी सांगितले.

नागपूर : यंदा दसरा आणि दिवाळी सण ऑक्टोबर महिन्यात आले. या महिन्यात लोकांनी दुचाकी, चारचाकी, व्यावसायिक आणि इलेक्ट्रिक वाहनांची मनमुराद खरेदी केली. दोन वर्षांच्या तुलनेत यंदा वाहन बाजार तेजीत होता. यंदा अपेक्षेपेक्षा जास्त वाहनांची विक्री झाल्याचे विविध कंपन्यांच्या विक्रेत्यांनी सांगितले. पण सेमी कंडक्टर चीपच्या तुटवड्यामुळे बुकिंग उन्हाळ्यात केलेल्या अनेकांना चारचाकी दिवाळीत मिळाल्याची माहिती आहे.

वाहन बाजार तेजीत

चारचाकी : ऑक्टोबर महिन्यात ३१ पर्यंत आरटीओकडे जवळपास २५९० वाहनांची नोंद झाल्याची माहिती आहे. हा आकडा काही वर्षांतील जास्त आहे.

दुचाकी : ३१ ऑक्टोबरपर्यंत १० हजारांपेक्षा जास्त दुचाकी वाहनांची आरटीओमध्ये नोंद झाली आहे. यंदा सर्वाधिक विक्री झाली आहे.

इलेक्ट्रिकल वाहने : आता इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकींना प्रचंड मागणी आहे. ही वाहने महाग आहेत. पण सबसिडी असल्यामुळे लोकांना आर्थिक फायदा होत आहे. ऑक्टोबरमध्ये जवळपास २ हजार दुचाकी आणि २०० चारचाकी विकल्याची नोंद आहे.

चारचाकीसाठी सहा-सहा महिने वेटिंग

चारचाकी वाहनांमध्ये लावण्यात येणाऱ्या सेमी कंडक्टर चीपच्या तुटवड्यामुळे आधी आवडत्या चारचाकी वाहनांसाठी लोकांना सहा-सहा महिने वाट पाहावी लागत होती. पण आता चीपचा तुटवडा कमी होऊ लागल्यामुळे काही कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार सहज मिळत आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रतीक्षा

काही कंपन्यांच्या दुचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी अजूनही जास्त दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. काही कंपन्यांच्या कार खरेदीसाठी प्रतीक्षा यादी कमी झाली आहे.

१५८ व्यावसायिक गाड्यांची विक्री

यंदा दसरा आणि दिवाळीत घरगुती चारचाकी वाहनांसोबत व्यावसायिक गाड्यांच्या विक्रीची आरटीओमध्ये मोठ्या प्रमाणात नोंद झाली आहे. जवळपास १५८ व्यावसायिक गाड्यांची विक्री झाल्याची नोंद आहे.

नवीन १०० रिक्षा रस्त्यावर

या महिन्यात पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक, एलपीजी आणि सीएनजीवर धावणाऱ्या १०० पेक्षा जास्त रिक्षांची विक्री झाली आहे. सर्वाधिक विक्री इलेक्ट्रिक रिक्षांची झाल्याची माहिती आहे.

दसरा आणि दिवाळी एकाच महिन्यात आली. ऑक्टोबर महिन्यात १० हजारांपेक्षा जास्त दुचाकी आणि २५९० पेक्षा जास्त चारचाकींची विक्री झाल्याची माहिती आहे. यामध्ये १० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा आहे. यंदा विक्रेत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता.

डॉ. पी.के. जैन, दुचाकी व चारचाकी विक्रेते.

टॅग्स :carकार