शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून मतमोजणीवर आक्षेपांचा भडीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:18 IST

नागपूर व रामटेकच्या मतमोजणीला सुरुवात होताच काँग्रेसकडून ईव्हीएम बदलण्यात आल्याची तक्रार करीत मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला. यानंतर मतमोजणीची प्रक्रिया पार पडेपर्यंत काँग्रेसकडून आक्षेपांचा भडीमार सुरूच होता. रामटेकचे काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी तब्बल ५० वर आक्षेप घेतले. तर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी थेट जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मतमोजणीत तफावत असल्याची तक्रार केली.

ठळक मुद्देकिशोर गजभिये यांनी घेतले ५० वर आक्षेप नाना पटोले यांनीही केली मतमोजणीच्या संख्येत तफावत असल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर व रामटेकच्या मतमोजणीला सुरुवात होताच काँग्रेसकडून ईव्हीएम बदलण्यात आल्याची तक्रार करीत मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला. यानंतर मतमोजणीची प्रक्रिया पार पडेपर्यंत काँग्रेसकडून आक्षेपांचा भडीमार सुरूच होता. रामटेकचे काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी तब्बल ५० वर आक्षेप घेतले. तर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी थेट जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मतमोजणीत तफावत असल्याची तक्रार केली. 

मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. मतमोजणीच्या प्रक्रियेत असलेल्या उत्तर नागपुरातील काँग्रेस प्रतिनिधींकडे ईव्हीएम मशीनच्या क्रमांकाची यादी होती. मोजणीच्या वेळी प्रतिनिधींकडे असलेल्या ईव्हीएमच्या यादीतील क्रमांक आणि प्रत्यक्षात मोजणीच्या वेळी असलेल्या ईव्हीएम मशीनच्या क्रमांकात तफावत होती. दक्षिण व मध्य नागपूर विधानसभेतही असाच प्रकार लक्षात आला. काँग्रेसच्या प्रतिनिधींनी यावर आक्षेप घेतला. तीन ईव्हीएम मशीनच्या क्रमांकात घोळ असल्याचे त्यांनी सांगितले. मध्य नागपूरच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व काँग्रेसच्या उमेदवारांचे प्रतिनिधी अनिल वडपल्लीवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे प्रकरण नेले. सहायक निर्णय अधिकारी आणि काँग्रेसच्या प्रतिनिधींनी सर्व प्रकार सांगितला. भाजपचे प्रतिनिधीही तिथे आले. त्यांनी प्रक्रिया योग्य असल्याचे सांगितले. मुदगल यांनी तुमच्याकडे असलेली यादी अधिकृत नाही. त्यावर प्रशासनाचा शिक्का नाही, असे म्हणत तक्रार निकाली काढली. काँग्रेसने मात्र यावर असमाधान व्यक्त केले. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली.दुसरीकडे रामटेक लोकसभा मतदार संघातही काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी आक्षेपांचा भडीमार केला. मतमोजणीला सुरुवात होताच काही ईव्हीएम मशीनचे सील व्यवस्थित नाही. मशीन सुरू होत नाही, अशाप्रकारच्या अनेक तक्रारींचा भडीमार गजभिये यांनी केला. मतमोजणी संपेपर्यंत त्यांचे आक्षेप सुरूच होते.जनतेचा कौल मान्य, पण मतदानाची चोरी होऊ नये - पटोलेमतदानाच्या वेळी उपयोगात आलेल्या ईव्हीएमची माहिती उमेदवाराला द्यायला पाहिजे होती ती दिली नाही. आमच्याकडे असलेली ईव्हीएमची माहिती आणि प्रत्यक्ष उपयोगात आणण्यात येत असलेले ईव्हीएम यात अंतर आहे. निवडणूक आयोगाची वेबसाईट आणि फेरीतील मतदान यात अंतर असल्याबाबतची तक्रार पटोले यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे मतदान केंद्रावरच केली. ईव्हीएममध्ये गडबड असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNana Patoleनाना पटोले