शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
4
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
5
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
6
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
7
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
8
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
9
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
10
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
11
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
12
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
13
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
14
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
15
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
16
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
18
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
19
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
20
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

बॉम्बच्या अफवेने इमरजन्सी लॅन्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2016 02:37 IST

भुवनेश्वरहून मुंबईकडे जाणाऱ्या गो एअरच्या प्रवासी विमानात बॉम्ब असल्याच्या निनावी फोनने शनिवारी सकाळी एकच खळबळ उडाली.

गो- एअरचे विमान नागपुरात : प्रशासनाची तारांबळ नागपूर : भुवनेश्वरहून मुंबईकडे जाणाऱ्या गो एअरच्या प्रवासी विमानात बॉम्ब असल्याच्या निनावी फोनने शनिवारी सकाळी एकच खळबळ उडाली. अखेर हे वृत्त खोटे ठरल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तपास यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला. गो एअर कंपनीच्या जी८-२४३ या भुवनेश्वर ते मुंबई या मार्गावरील विमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन भुवनेश्वर विमानतळावर आला. या घटनेची सूचना नागपूर विमानतळ प्राधिकरण आणि नागपूर पोलिसांना मिळाली. विमानतळ प्राधिकरणाच्या परवानगीनंतर विमान तातडीने सकाळी ९.३५ वाजता नागपूर विमानतळावरील बाजूच्या धावपट्टीवर उतरविण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने विमानाभोवती सुरक्षा पथकाने घेराव केला. सीआयएसएफच्या बॉम्ब निरोधक पथकाने १५३ प्रवाशांना खाली उतरविले आणि विमानाची तपासणी केली. तपासणी पथकाला स्फोटके आढळून आली नाहीत. विमानाने भुवनेश्वरवरून सकाळी ८.२० वाजता उड्डाण भरले होते. तपासणीनंतर विमानाने नागपूर विमानतळावरून भुवनेश्वरकडे दुपारी १२.२२ वाजता उड्डाण भरले.प्राप्त माहितीनुसार विमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन भुवनेश्वर विमानतळावर विमानाने उड्डाण भरल्यानंतर आला. भुवनेश्वर प्राधिकरणाने या घटनेची सूचना नागपूर, मुंबई आणि दिल्ली येथे दिली. त्यानंतर विमानाचे इमरजन्सी लॅण्डिंग करून तपासणी करण्यात आली. विमानात एक बेवारस बॅग असल्याची सूचना मिळाली होती. त्याआधारे विमानाची तपासणी करण्यात आली. ही बॅग फ्लाईट इंजिनिअरची असल्याची माहिती आहे. तो ही बॅग भुवनेश्वर येथे विसरला होता. (प्रतिनिधी)सुरक्षा यंत्रणा वेठीस धरणारा जेरबंदविमानात बॉम्ब असल्याचे सांगून सर्वत्र खळबळ उडवून देणाऱ्या आरोपीला पुण्यात अटक करण्यात आली. पुण्याचे पोलीस आयुक्त कौशल किशोर पाठक यांनी लोकमतशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. संजयकुमार मिश्रा (वय ३५, रा. धायरी, पुणे) असे त्याचे नाव असून तो मूळचा भुवनेश्वर (ओरिसा) येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे, त्याने आज पहाटे पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून पुणे रेल्वेस्थानक उडवून देण्याची धमकी दिली होती. फोन नंबरवरून आरोपीचा माग काढत आरोपी मिश्राला दौंड पोलिसांनी पाटस येथे ताब्यात घेतले. चौकशीत त्याने भुवनेश्वर-मुंबई विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन केल्याचे उघड झाले.