शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

नागपुरात बॉम्ब फुटले आणि रॉकेटही उडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 01:14 IST

रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडा, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही लोकांनी रात्री १० नंतरही फटाके फोडून दिवाळी साजरी केली. न्यायालयाने घातलेले वेळेचे बंधन झुगारून बॉम्बही फुटले आणि रॉकेटही उडाले. देशाच्या कानाकोपऱ्यात फटाक्यांचे आवाज घुमले आणि प्रचंड आतषबाजीने आसमंत उजळून गेला.

ठळक मुद्देलोकांनी न्यायालयाच्या आदेशाची केली अवहेलना : आतषबाजीने आसमंत उजळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडा, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही लोकांनी रात्री १० नंतरही फटाके फोडून दिवाळी साजरी केली. न्यायालयाने घातलेले वेळेचे बंधन झुगारून बॉम्बही फुटले आणि रॉकेटही उडाले. देशाच्या कानाकोपऱ्यात फटाक्यांचे आवाज घुमले आणि प्रचंड आतषबाजीने आसमंत उजळून गेला.प्रदूषण न पसरवणारे फटाके रात्री ८ ते १०च्या दरम्यानच फोडा, असा न्यायालयाचा आदेश होता. या बंधनामुळे दिवाळी साजरी करायची कशी, अशी चर्चा लोकांमध्ये होती. मात्र देशभरात दिवाळी धूमधडाक्यात साजरी झाली. न्यायालयाने दिलेल्या वेळेच्या आधी आणि नंतरही फटाके फुटले. नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात दिवाळी साजरी केली. १२५ डेसिबल्स आवाजाच्या मर्यादेला फटाक्यांनी सुरुंग लावले.पोलिसांची गस्त आणि मार्गदर्शन

सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडावेत, त्यावर स्थानिक प्रशासनाने नजर ठेवावी, असे निर्देश नुकतेच दिले होते. न्यायालयाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करता यावी म्हणून राज्यभर पोलिसांची विशेष पथके स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक ठाण्यांतर्गत पोलिसांच्या गाड्या फिरून माईकवरून नागरिकांना रात्री १० नंतर फटाके फोडू नका, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करू नका, असे निर्देश देत होते. पोलिसांना सर्वच ठिकाणी ग्रस्त घालणे शक्य नव्हते. रात्री १०नंतरही फटाक्यांचे आवाज येत होते. मध्यरात्रीपर्यंत फटाक्यांचे आवाज सुरूच होते.फटाका विक्रीला फटका
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा परिणाम यंदा फटाके विक्रीवर झाला. एकीकडे फटाक्यांचे भाव २० टक्क्यांनी वाढले तर दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशामुळे यंदा फटाके विक्री २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. जीएसटीचा विक्रीवर परिणाम झाला. जीएसटीमुळे फटाक्यांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या. यंदा मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना जास्त मागणी होती, असे विक्रेत्यांनी सांगितले.चिनी फटाक्यांची विक्री
चिनी फटाक्यांवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याची माहिती आहे. लहान मुलांमध्ये प्रचलित असलेल्या पॉपपॉप फटाक्यांना मोठी मागणी होती. छोटासा बॉम्ब जमिनीवर आदळ्यानंतर फुटतो. शिवाय या बॉम्बचे पावडर पॅकेजमध्ये विक्री करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. चिनी फटाके आरोग्याला हानीकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. या फटाक्यांच्या निर्मितीसाठी वापरलेला कच्चा माल मानवी आरोग्यास घातक ठरणारा आहे. फटाक्यांच्या धुराने केवळ प्रदूषणच नव्हे, तर अंधत्व येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

 

टॅग्स :DiwaliदिवाळीCrackersफटाके