शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

खळबळजनक! भंगार दुकानात बॉम्बस्फोट; एक मजूर ठार तर एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 22:18 IST

Nagpur News भंडारा रोडवर असलेल्या कापसी गावातील भंगार गोदामात पुलगाव येथून आणलेले निकामी बाॅम्बशेल कटरने कापत असताना झालेल्या स्फोटात एक मजूर जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

नागपूरः निकामी समजून दारूगोळा (बॉम्ब शेल) गॅस कटरने कापत असताना जोरदार स्फोट झाला. त्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा जबर जखमी झाला. भंडारा मार्गावर पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भंगार गोदामात सोमवारी सायंकाळी हा थरार घडला.  गुड्डु भभूतलाल रतनेरे (वय ५२, उप्पलवाडी) असे मृताचे तर सुमीत सुकरलाल मरसकोल्हे (वय २१, रा. यशोधरानगर) असे जखमीचे नाव आहे.  

अब्दुल रशीद अब्दुल अजीज (वय ४८, रा. हसनबाग) नामक व्यक्तीचे भंडारा मार्गावरील पारडी - कापसीतील बाराद्वारी येथे ए. आर. ट्रेडर्स नावाने भंगाराचे मोठे गोदाम आहे. अब्दुल रशीद हे भंगाराचे मोठे व्यापारी असून त्यांनी पुलगावच्या (जि. वर्धा) सीएसडी कॅम्पमध्ये ३० मे २०२२ झालेल्या लिलावात निकामी दारूगोळा विकत घेतला होता. हा दारूगोळा गोदामात ठेवल्यानंतर काही दिवसांपासून त्याच्या कटिंगचे काम सुरू झाले. सोमवारी सायंकाळी गुड्डू रतनेरे दारूगोळ्यातील एक बॉम्ब शेल गॅस कटरने कापत होते. मदतीसाठी बाजुलाच सुमीत होता. शेल कापताना शक्तीशाली स्फोट झाला. त्यात गुड्डु रतनेरे जागीच ठार झाले. तर सुमीत सुकरलाल मरसकोल्हे (वय १९) हा जखमी झाला. हा स्फोट एवढा शक्तीशाली होता की आजुबाजुच्या परिसरातही मोठा आवाज होऊन हादरा बसला. जखमी सुमितसह गोदामाच्या बाजुला असलेल्यांनी आरडाओरड करीत धाव घेतली. ते पाहून बाजुच्या परिसरातील मंडळींनी पारडी पोलिसांना कळविले.

ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. माहिती कळताच पोलीस उपायुक्त सारंग अव्हाड, सहायक आयुक्त नयना अलुरकर यांच्यासह बॉम्ब शोधक (बीडीडीएस) आणि नाशक पथक, गुन्हे शाखेचे आणि अग्निशमन दलाचे पथकही पोहचले. जखमी सुमीतला एका खासगी ईस्पितळात दाखल करण्यात आले. सभोवतालचा परिसर सीलबॉम्ब स्फोट झाल्याचे वृत्त वायुवेगाने सर्वत्र पोहचले. त्यामुळे घटनास्थळी पावसाचे वातावरण असूनदेखिल अल्पावधीतच मोठी गर्दी जमली. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी बीडीडीएसच्या माध्यमातून गोदाम आणि सभोवतालचा परिसर सील करून घेतला.

टॅग्स :Blastस्फोट