शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

बोअरवेलच्या भ्रष्टाचाराची चौक शी

By admin | Updated: May 6, 2015 02:07 IST

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उपाययोजना म्हणून ...

नागपूर : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उपाययोजना म्हणून १५५९ बोअरवेलच्या कामांना मंजुरी दिली आहे. परंतु यातील जेमतेम ६७ कामे करण्यात आली. ही कामे निकषानुसार नसून यात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी असल्याने या कामाची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे कंत्राटदारांत खळबळ उडाली आहे.उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा व्हावा यासाठी टंचाई निवारण आराखड्यात २६७ तर अतिरिक्त टंचाई आराखड्यात १०५० बोअरवेलच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी बोअरवेलच्या २४२ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या कामाची चौकशी होत नसल्याने वर्षभरापूर्वी बोअरवेलच्या कामासाठी कंत्राटदारांच्या उड्या पडत होत्या. त्यांनी कमी दराने कामे घेतली. परंतु यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आले. बोअरवेलसाठी कमी जाडीच्या पाईपचा वापर करण्यात आला. तसेच पाणी नसलेल्या बोअरवेलवर हातपंप बसविण्याचे प्रकार घडले आहे.जिल्ह्यासाठी २० कोटीचा टंचाई निवारण आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने बोअरवेलच्या कामांचा समावेश आहे. नळयोजनांची दुरुस्ती, विंधन विहिरीची दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना व टँकरद्वारे पाणीपुरवठा अशा स्वरुपाच्या उपाययोजनांचा यात समावेश आहे. तसेच ३५०च्या आसपास खासगी विहिरीचे अधिग्रहण केले जाणार आहे. या कामाचा जि.प.अध्यक्ष निशा सावरकर यांनी आढावा घेतला. उपाध्यक्ष शरद डोणेकर, कृषी सभापती आशा गायकवाड, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, जयकुमार वर्मा, मनोज तितरमारे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियता संतोष गव्हाणकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.(प्रतिनिधी)पाच कोटींची योजना रखडलीपारशिवनी व इतर पाच गावांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पाच कोटीची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने हाती घेतली होती. परंतु अद्याप ही योजना कार्यान्वित झालेली नाही. त्य्\ाामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे टंचाईग्रस्त गावात उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेले प्रपत्र अद्याप सादर केले नसल्याने कामे रखडल्याचे मनोज तितरमारे यांनी निदर्शनास आणले. पाणीपुरवठा विभागातील उपअभियंत्याची नऊ रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरल्यास कामे मार्गी लागतील अशी सूचना त्यांनी केली.