शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा  : हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 21:58 IST

हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या नॅशनल अकॅडेमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेन्टमधील बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे अशा विनंतीसह ऑर्गनायझेशन फॉर राईटस् ऑफ ट्रायबलने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देऑफिस मेमोरन्डमच्या वैधतेला आव्हान

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या नॅशनल अकॅडेमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेन्टमधील बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे अशा विनंतीसह ऑर्गनायझेशन फॉर राईटस् ऑफ ट्रायबलने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.नॅशनल अकॅडेमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेन्टमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. केंद्र सरकारने ८ एप्रिल २०१९ रोजी ऑफिस मेमोरन्डम जारी करून त्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीला संरक्षण दिले आहे. त्यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे. हे ऑफिस मेमोरन्डम महाराष्ट्र जात प्रमाणपत्र कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे ऑफिस मेमोरन्डम अवैध ठरवून रद्द करण्यात यावे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.संबंधित कर्मचाऱ्यांनी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता अवैध पद्धतीने जात प्रमाणपत्रे मिळविली आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ बडतर्फ करणे आवश्यक आहे. परंतु, केंद्र सरकारने तसे न करता या कर्मचाऱ्यांना संरक्षण दिल्यामुळे खऱ्या आदिवासींवर अन्याय व त्यांच्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करण्याचा आदेश दिला आहे. वादग्रस्त ऑफिस मेमोरन्डम या आदेशाचे उल्लंघन करणारे आहे असेही याचिकाकर्त्यांनी याचिकेत नमूद केले आहे.केंद्र व राज्य सरकारला नोटीसयाचिकेवर सोमवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने केंद्रीय कार्मिक मंत्रालयाचे सचिव, राज्याचे मुख्य सचिव, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव व नॅशनल अकॅडेमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेन्ट यांना नोटीस बजावून आठ आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर