शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशातील बोगस बियाणे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:01 IST

खरीप हंगाम तोंडावर असल्याने मोठ्या संख्येने बोगस बियाण्यांची तस्करी मध्य प्रदेशातून नागपुरात करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या निगराणी पथकाने मध्य प्रदेशातून बोगस बियाणे नागपुरात आणणाऱ्या ईश्वर साळवे यांच्याकडून ४४० पॅकेट बियाणे जप्त केले. त्याच्यावर केळवद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात कृषी विभागाने बोगस बियाण्यांची चौथी कारवाई केली आहे.

ठळक मुद्देवाहनांसह १३ लाख ३० हजाराचा माल जप्त : कृषी विभागाच्या निगराणी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगाम तोंडावर असल्याने मोठ्या संख्येने बोगस बियाण्यांची तस्करी मध्य प्रदेशातून नागपुरात करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या निगराणी पथकाने मध्य प्रदेशातून बोगस बियाणे नागपुरात आणणाऱ्या ईश्वर साळवे यांच्याकडून ४४० पॅकेट बियाणे जप्त केले. त्याच्यावर केळवद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात कृषी विभागाने बोगस बियाण्यांची चौथी कारवाई केली आहे.यात कापसाच्या बियाण्यांच्या आठ जाती होत्या. ईश्वर साळवे हा एमएच४० एसी ३६४७ या वाहनाने मध्य प्रदेशातून नागपूरला येत होता. दरम्यान निगराणी पथकाच्या लक्षात येताच त्याच्या वाहनांची तपासणी केली. यात अनाधिकृत, बेकायदेशीर, विनापरवाना असलेले बियाणे आढळले. ३ लाख ३० हजार रुपये किमतीचे हे बियाणे होते. कृषी विभागाच्या भरारी पथकाने पंचनामा करून त्याच्या विरुद्ध केळवद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या कारवाईत कृषी अधिकारी प्रवीण देशमुख, तंत्र अधिकारी व विभागीय गुण नियंत्रक संदीप पवार, पं.स. उमरेडचे कृषी अधिकारी प्रवीण नागरगोजे व पं.स. उमरेडचे कृषी अधिकारी चंद्रशेखर वानखेडे सहभागी होते. या कारवाईत केळवद पोलीस स्टेशनचे निरीक्षक डी.एम. गोंदवे यांचेही सहकार्य लाभले. ईश्वर साळवे हे मध्य प्रदेशातून बोगस बियाण्यांची खरेदी करून नागपुरात विक्री करीत होते. हंगामाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे बाजारात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी परवानाधारकांकडून करावी व त्याची पावती व काही बियाणे संग्रही करून ठेवावे, जेणेकरून त्याचा मोबदला शेतकºयांना मिळण्यास मदत होईल, असे कृषी अधिकारी प्रवीण देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :raidधाडagricultureशेती