शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बोगस प्रमाणपत्र प्रकरण : निवृत्त क्रीडा उपसंचालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 00:15 IST

Retired Deputy Director Sports arrested , crime news बोगस क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळविल्या प्रकरणात मानकापूर पोलिसांनी सेनानिवृत्त क्रीडा उपसंचालक व क्रीडा अधिकाऱ्याला अटक केली आहे.

ठळक मुद्देमानकापूर पोलिसांची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : बोगस क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळविल्या प्रकरणात मानकापूर पोलिसांनी सेनानिवृत्त क्रीडा उपसंचालक व क्रीडा अधिकाऱ्याला अटक केली आहे. आरोपींमध्ये सुभाष रेवतकर (६०) व महेश पडोळे (५२) भंडारा यांचा समावेश आहे.मानकापूर पोलिसात १९ सप्टेंबरला गुन्हा दाखल झाला होता. क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्र बनवून दिल्याने अनेकांनी सरकारी नोकरी मिळविली होती. हे प्रमाणपत्र वेगवेगळ्या खेळांसाठी दिले होते. पश्चिम महाराष्ट्रातील एका युवकाने नागपूर येथील क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडून बोगस प्रमाणपत्र मिळविले होते. या प्रकरणाच्या चौकशीत घोटाळा झाल्याचा खुलासा झाला. मानकापूर पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला होता. पोलिसांनी रत्नागिरी येथील क्रीडा अधिकारी सुभाष सावंत व त्याच्या भावाला अटक केली होती. त्याच्या भावाची क्रीडा कोट्यातून पीएसआयसाठी निवड झाली होती.प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना सेवानिवृत्त उपसंचालक सुभाष रेवतकर व क्रीडा अधिकारी महेश पडोळे हे प्रकरणात गुंतले असल्याची माहिती मिळाली. आज दोघांनाही अटक करण्यात आली. रेवतकर नागपुरात कार्यरत असताना त्यांच्या काळात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्याचप्रकारे पडोळेसुद्धा नागपुरातच कार्यरत होते. सध्या ते भंडारा येथे कार्यरत आहेत. बुधवारी दोघांना न्यायालयात सादर करून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक