शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन मंत्र्यांच्या नावे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र

By admin | Updated: August 5, 2016 03:03 IST

वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक असे एकही साहित्य नाही. ना डोळ्याची तपासणी, ना कानाची, ना अपंग असल्याची, तरीही ...

पैसे देताच ना तपासणी, ना चाचपणी : आरटीओतील भोंगळ कारभार सुमेध वाघमारे/ विशाल महाकाळकर नागपूर वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक असे एकही साहित्य नाही. ना डोळ्याची तपासणी, ना कानाची, ना अपंग असल्याची, तरीही चालक वैद्यकीयदृष्ट्या फिट असल्याचे प्रमाणपत्र नागपूरच्या शहर व ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) मुख्य द्वाराजवळील टपरीवर मिळते. रस्त्यावर धावणाऱ्या लाखो लोकांचा जीव हाती असणारा चालक सक्षम असल्याचा दाखला देण्याची ही पद्धत जीवघेणी ठरत आहे. ‘लोकमत’चमूने गुरुवारी स्टींग आॅपरेशन करीत या गोरखधंद्याचा भंडाफोड केला. याच खात्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या नावाचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या तथाकथित डॉक्टरांकडे अर्ज केला. अर्ज करताच संबंधित डॉक्टरने किस न पाडता थेट पैसे घेतले व डोळे मिटून दिवाकर रावते हे ‘फिट’ असल्याचे प्रमाणपत्र दिले. वयाची चाळीशी गाठलेल्यांना वाहन परवाना काढताना, आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढताना किंवा वाहन परवानाचे नूतनीकरण करून घेतांना संबंधित चालक हा शारिरीक दृष्टीने सुदृढ ‘फिट’ असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्याचा नियम आहे. या प्रमाणपत्राशिवाय आरटीओ परवाना देत नाही. पूर्वी हा परवाना अ‍ॅलोपॅथीसह, होमिओपॅथी, युनानी व आयुर्वेदिक डॉक्टर द्यायचे. तीन वर्षांपूर्वी याला विरोध झाल्याने शासनाने केवळ अ‍ॅलोपॅथीच्याच डॉक्टरांचे प्रमाणपत्र ग्राह्य मानले जाईल, असे निर्देश दिले. मात्र याचा फारसा परिणाम राज्यभरातील आरटीओसमोर टपरीवर बसून वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या तथाकथित डॉक्टरांवर झालेला नाही. आरटीओच्या परिसरातच गोरखधंदा आरटीओ कार्यालयाच्या परिसरातच बसणारे हे डॉक्टर बोगस तर नाही ना, याची साधी शंकाही आरटीओ अधिकाऱ्यांनी घेतली नाही. या दोन्ही कार्यालयात रोज २०० हून अधिक परवान्यांसाठी हे बोगस प्रमाणपत्र दिले जाते. सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत ही ‘ओपीडी’ सुरू असते. हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे, मात्र कोणत्याही आरटीओ अधिकाऱ्याने या संदर्भात हरकत घेतलेली नाही. वैद्यकीय प्रमाणपत्र का आवश्यक वाहन परवाना देताना चालक हा शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावा, असा नियम आहे. हे सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असते. अर्जदार चालक हा अपंग तर नाही ना, याची तपासणी करीत त्याच्या डोळ्याची आणि कानाची तपासणी प्राधान्याने करावी लागते. यासाठी संबंधित तज्ज्ञांची आवश्यकता असते, मात्र आरटीओसमोरील या डॉक्टरांच्या टपरीवर आवश्यक कोणतेही साधन नाही. कान, डोळे तपासणीतील तज्ज्ञ ही तर फार दूरची गोष्ट आहे. पैसे द्या, कशाला हवा अर्जदार याच कार्यालयाच्या जुन्या प्रवेशद्वाराजवळील अतिक्रमण केलेल्या एका टपरीवर एक डॉक्टर खुर्ची टाकून बसला होता. त्याच्याकडे वैद्यकीय तपासणीसाठी लागणारे कुठलेही साहित्य नव्हते. केवळ पेन व शिक्क्यांच्या भरवशावर भराभर ‘फॉर्म १-ए’ वैद्यकीय प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करीत होता. या डॉक्टरसमोर दिवाकर रावते यांचा अर्ज धरत अर्जदाराला बोलावू का, असा प्रश्न केला. यावर त्या डॉक्टरने त्याची काय गरज, ५० रुपये आहे काय, असा उलट प्रश्न विचारला. पैसे दिल्यावर, त्याने अर्ज नीट भरलेला आहे का ते पाहिले. वडिलाचे नाव लिहिले नसल्याचे सांगून ते विचारत स्वत:च लिहिले तसेच ‘आयडेंटीफिकेशन मार्क्स’चुकीचे लिहिल्याचे सांगून त्यात दुरुस्ती केली. नंतर फोटोवर स्वाक्षरी करीत शिक्का मारून प्रमाणपत्र दिले. दलालानेच दिले डॉक्टरचे प्रमाणपत्र नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयाच्या शुल्क भरण्याच्या खिडकीजवळच एका दलालाने टेबल खुर्ची टाकून ‘क्या काम है साहब’ विचारत होता. याला डॉक्टर कुठे बसतो, असे विचारल्यावर मीच डॉक्टर आहे असे सांगितले. त्याने फोटो मागून घेतला. त्याला रावते यांचा फोटो व त्यांच्या संदर्भातील माहिती दिली. त्यांने स्वत:च ‘फॉर्म १-ए’ भरला. फोटोही चिकटवित दोन मिनिटे थांबा असे सांगत तो कुठेतरी गेला आणि प्रमाणपत्र घेऊन आला. याचे त्याने १०० रुपये घेतले. त्याला डॉक्टर कुठे आहे असे विचारल्यावर दूरुनच त्यांच्याकडे बोट दाखविले. असे केले स्टिंग आॅपरेशन केवळ २० रुपयांत मिळाले प्रमाणपत्र ‘फॉर्म १-ए’ हा आरटीओशी संबंधित वैद्यकीय प्रमाणपत्राचा नमुना आहे. ‘लोकमत चमूने’ शहर आरटीओ कार्यालयातून हा अर्ज घेतला. या अर्जावर राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे नाव लिहून तो संपूर्ण भरला. फोटोच्या रकान्यात रावते यांचा फोटो चिकटविला. हा अर्ज शहर आरटीओ कार्यालयासमोरील नाल्याच्या पुलावर उभ्या असलेल्या डॉक्टरला दिला. या डॉक्टरने अर्जदार कुठे आहे, अर्ज कशासाठी हवा आहे या प्रश्नांच्या भानगडीत न पडता थेट फोटोवर स्वाक्षरी करीत शिक्का लावला आणि २० रुपये झाल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, त्याच्याकडील शिक्क्यावर डॉक्टरचे नाव, पदवी किंवा रजिस्टर नंबरही नीट दिसत नव्हते. परंतु पैसे कमी घेत असल्याने हा एकटा डॉक्टर रोज १०० वर वैद्यकीय प्रमाणपत्र देत असल्याची माहिती आहे.