लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उन्हाळ्यात रेल्वेत प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत बोगस आयडीच्या (ओळख पत्र) आधारे आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून ई-तिकिट देण्याचा गोरखधंदा शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाने उजेडात आणला. यापूर्वी मुंबईत अशाच प्रकारच्या कारवाईत दीड कोटी रुपयांची ई-तिकीट जप्त केली होती, हे उल्लेखनीय.ही कारवाई शुक्रवारी सकाळी मेयो हॉस्पिटल चौकात सदोदय कॉम्प्लेक्समधील शोभना ट्रॅव्हल्समध्ये करण्यात आली. आयपीएफने सी-५, पार्क व्ह्यू अपार्टमेंट किंग्जवे येथील रहिवासी आरोपी मनीष राजेंद्र प्रसाद भार्गव (५०) याला अटक केली. सोबत त्याच्याकडून ६८ प्रवाशांकरिता तयार केलेली ९२ हजार २३९ रुपये मूल्याची ३२ लाईव्ह ई-तिकिटे आणि तीन संगणक, एक लॅपटॉप, दोन मोबाईल, तीन इंटरनेट डोंगल, एक वायरलेस राऊटर व दोन पेन ड्राईव्ह जप्त केले.या कारवाईची माहिती देताना आरपीएफ कमांडंट ज्योतिकुमार सतीजा यांनी सांगितले की, आरपीएफला ई-तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त मिळाली होती. या आधारावर शुक्रवारी सकाळी आरपीएफच्या (डीएससी आॅफिस) चमूने गणेशपेठ पोलिसांसोबत मेयो चौकातील सदोदय कॉम्प्लेक्समधील शोभना ट्रॅव्हल्सवर धाड टाकली. अधिकाऱ्यांच्या चमूमध्ये निरीक्षक ए.सी. सिन्हा, उपनिरीक्षक कृष्णानंद राय, होतीलाल मीना, राजेश औतकर, प्रधान आरक्षक राकेश करवाडे, जगदीश सोनी, आरक्षक अश्विन पवार, अमित बारापात्रे आणि विवेक कनोजिया यांना मनीष भार्गव बोगस आयडीने ई-तिकिट तयार करताना सापडला.कुटुंबीय करतात सहकार्यआरोपी मनीष भार्गव याचे कुटुंबीय तिकिटांच्या अवैध व्यवहारात सहकार्य करीत असल्याची माहिती आहे. या अवैध व्यवहारातून त्याने आलिशान घर बनविले आहे. आरोपीची पत्नी या कामात लिप्त असल्याची माहिती आहे. ती सरकारी कार्यालयात नोकरी करीत आहे.आरोपीवर २०१५ मध्ये गुन्ह्याची नोंदआरोपी मनीष भार्गवने गुन्हा कबूल करताना सांगितले की, यापूर्वी माझ्या विरोधात नागपुरातील आरपीएफ ठाण्यात वर्ष २०१५ मध्ये रेल्वे आरक्षणाचा काळाबाजार करण्यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.काय जप्त केलेशोभना ट्रॅव्हल्सच्या कार्यालयातून आरपीएफ दलाने आरोपी मनीष भार्गव याला अटक करून ६८ प्रवाशांसाठी तयार केलेली ९२ हजार २३९ रुपये मूल्याची ३२ लाईव्ह तिकिटे आणि तीन संगणक, एक लॅपटॉप, दोन मोबाईल, ३ इंटरनेट डोंगल, एक वायरलेस राऊटर व दोन पेन ड्राईव्ह जप्त केले.
बोगस आयडीने ई-तिकिटांचा गोरखधंदा उजेडात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:35 IST
उन्हाळ्यात रेल्वेत प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत बोगस आयडीच्या (ओळख पत्र) आधारे आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून ई-तिकिट देण्याचा गोरखधंदा शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाने उजेडात आणला.
बोगस आयडीने ई-तिकिटांचा गोरखधंदा उजेडात
ठळक मुद्दे मुंबईनंतर नागपुरात बोगस आयडी : ३२ लाईव्ह ई-तिकीट, आयपीएफची कारवाई