शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

गादा शिवारात तरुणाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:10 IST

कामठी : नागपूर-जबलपूर महामार्गावरील गादा शिवारात सर्व्हिस राेडलगत तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. ...

कामठी : नागपूर-जबलपूर महामार्गावरील गादा शिवारात सर्व्हिस राेडलगत तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

मंगेश आनंदराव ठाकरे (३०, रा. गादा, ता. कामठी) असे मृत तरुणाचे नाव आहे. गादा शिवारातील ढाब्याच्या मागील बाजूस सर्व्हिस राेडलगत तरुण मृतावस्थेत पडून हाेता. त्याच्या शेजारी एमएम-४०/बीडी-७१६१ क्रमांकाची दुचाकी उभी हाेती. ही बाब लक्षात येताच मार्गाने जाणाऱ्या व्यक्तीने पाेलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत तरुणाच्या खिशातील आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसन्सवरून मृत तरुणाची ओळख पटली. त्याद्वारे पाेलिसांनी मृताच्या कुटुंबीयांना सूचना देऊन त्याची ओळख पटविली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणी नागपूर मेडिकल रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी नवीन कामठी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस उपनिरीक्षक एस. नराेटे करीत आहेत.

मंगेशचा मृतदेह आढळल्याची माहिती कळताच गादा गावात शाेककळा पसरली. मृत मंगेश हा सिमेंट मिक्सर कंपनीमध्ये वाहनचालक म्हणून कार्यरत हाेता. रविवारी सकाळी कामावर जात असल्याचे सांगून ताे घरून निघून गेला हाेता. दरम्यान रात्र हाेऊनही घरी न परतल्याने ताे कामावर असेल, असे कुटुंबीयांना वाटले. मात्र मध्यरात्री पाेलीस त्याच्या मृत्यूची बातमी घेऊन आल्याने कुटुंबीयांना धक्काच बसला.