शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत गैरवर्तणुकीवर लक्ष ठेवणार ‘बॉडी वॉर्न कॅमेरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 11:44 IST

धावत्या रेल्वेत प्रवासी असो वा आरपीएफ जवान, आता त्यांच्या गैरवर्तणुकीची माहिती कॅमेऱ्यात कैद होेणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) ट्रेन स्कॉटिंगमध्ये बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचा उपयोग करीत आहेत.

ठळक मुद्देदपूमरे नागपूर मंडळाच्या आरपीएफतर्फे ट्रेन स्कॉटिंगमध्ये उपयोगमंडळात पहिला प्रयोग

वसीम कुरैशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धावत्या रेल्वेत प्रवासी असो वा आरपीएफ जवान, आता त्यांच्या गैरवर्तणुकीची माहिती कॅमेऱ्यात कैद होेणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) ट्रेन स्कॉटिंगमध्ये बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचा उपयोग करीत आहेत. या कॅमेऱ्यांमुळे सुरक्षा जवान आणि प्रवाशांमध्ये होणाऱ्या संवादासह त्यांच्यातर्फे होणाऱ्या गैरवर्तणुकीची माहिती प्राप्त होणार आहे. अशा प्रकारचा प्रयोग नागपूर मंडळात पहिल्यांदा होत आहे.रेल्वे स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये सर्व घटना कैद होतात. पण धावत्या रेल्वेत दोन्ही पक्षांतर्फे होणाऱ्या गैरवर्तणुकीच्या आरोपानंतर खरे कोण बोलत आहेत, या निकर्ष काढणे कठीण असते. परंतु आता जवानांच्या कॉलरवर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात सर्व घटना कैद होत आहेत. २६ जानेवारीला आरपीएफला १० कॅमेरे मिळाले असून रेल्वेत तैनात जवानांना वितरित करण्यात आले आहेत. रेल्वेत बॉडी वॉर्न कॅमेऱ्याचा प्रयोग पश्चिम रेल्वे व राजकोट मंडळात झाला आहे. नागपुरात दपूम रेल्वे मंडळ आरपीएफने पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरू केला आहे. कॅमेरा जवळपास ५ सेंटीमीटर लांब असून बॅटरीवर चालणारा आहे. एकदा चार्ज केल्यानंतर १० तासांपर्यंत सुरू असतो. त्यातील रेकॉर्डिंग ३० दिवसांपर्यंत सुरक्षित ठेवता येते. आरोपानंतर कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग पाहून आणि ऐकून संबंधित प्रवासी आणि जवानांवर कारवाई करण्यात येईल.

पारदर्शकता आणण्याचा उद्देशट्रेन स्कॉटिंगमध्ये सहभागी सर्व जवानांच्या कॉलरवर लागलेल्या या कॅमेऱ्यामुळे कामात पारदर्शकता येणार आहे. धावत्या रेल्वेत कोण, कुणासोबत कसे वागत आहेत, याचा शोध घेणे सोपे होणार आहे. यामुळे आरपीएफ जवानांच्या कार्यप्रणालीवर देखरेख ठेवता येईल. सध्या या कॅमेऱ्याचा उपयोग मंडळांतर्गत नागपूर ते दुर्ग या दरम्यानच्या काही रेल्वेमध्ये करण्यात येत आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर याचा उपयोग सुरू आहे. चांगले परिणाम दिसून आल्यानंतर कॅमेऱ्यांची संख्या आणखी वाढविण्यात येईल.आशुतोष पांडे, वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त (आरपीएफ), दपूमरे, नागपूर.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे