शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या अधिकाऱ्याचा कारसह नदीपात्रात आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 21:30 IST

Nagpur News नागपूरच्या उपमुख्य श्रम आयुक्तांच्या केंद्रीय कार्यालयात कार्यरत असलेले श्रम प्रवर्तन अधिकारी अमित नेहरा यांचा मृतदेह दर्यापूर तालुक्यातील भामोदनजीक शहानूर नदीपात्रात आढळून आल्याने शंका-कुशंका व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देरहस्यमयरीत्या बेपत्ता होण्याची दिली होती तक्रार

नागपूर/दर्यापूर : नागपूरच्या उपमुख्य श्रम आयुक्तांच्या केंद्रीय कार्यालयात कार्यरत असलेले श्रम प्रवर्तन अधिकारी अमित नेहरा यांचा मृतदेह दर्यापूर तालुक्यातील भामोदनजीक शहानूर नदीपात्रात आढळून आल्याने शंका-कुशंका व्यक्त केली जात आहे.

संबंधितांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रम प्रवर्तन अधिकारी अमित नेहरा (वय ३३) २१ सप्टेंबरला कार्यालयीन दाैऱ्यावर गेले होते. २८ ला महत्त्वाची कॉन्फरन्स असल्याने नेहरा २७ सप्टेंबरला त्यांच्या मारुती रिटज् कारने (एचआर ७७ - ७२०५) जळगाव येथून नागपूरकडे निघाले. त्यानंतर त्यांचा काही पत्ता नाही. २८ सप्टेंबरच्या कॉन्फरन्समध्ये ते सहभागी न झाल्याने कार्यालयीन वरिष्ठांकडून त्यांच्याबाबतची चाैकशी सुरू करण्यात आली. त्यानंतर २७ सप्टेंबरच्या रात्री ७ वाजतापासून त्यांचा फोनही स्विच्ड ऑफ असल्याचे पुढे आले.

भामोद येथील काही शेतकऱ्यांना दर्यापूर ते दहिहांडा मार्गावरील शहानूर नदीपात्रात उलटलेल्या कारची चाके गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास दिसली. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. येवद्याचे ठाणेदार अमूल बच्छाव तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला घटनेची माहिती दिली.

दुपारी २ वाजता दरम्यान जिल्हा शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्वप्रथम दोर व ट्रॅक्टरच्या साहाय्याने कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, नदीच्या वेगवान प्रवाहामुळे ती बाहेर निघू शकली नाही. जिल्हा शोध व बचाव पथकाला कारमध्ये एकमेव चालक असल्याचे निदर्शनास येताच त्याचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने बाहेर काढण्यास विलंब होत होता. अखेर कार बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली. ही कार सोमवारी रात्री ११ च्या सुमारास पात्रात उलटली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

कार्यालय अधीक्षकांनी दिली होती मिसिंग कम्प्लेंट’

नागपूरच्या कार्यालय अधीक्षकांनी गुरुवारी दुपारी गिट्टी खदान पोलीस ठाण्यात ‘मिसिंग कम्प्लेंट’ दिली. अधिकाऱ्याचे रहस्यमयरीत्या बेपत्ता होणे आणि त्यांची कार पुरात वाहून गेलेली आढळणे या दोन बाबी अमरावती ग्रामीण आणि नागपूर पोलिसांशी कनेक्ट आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणचे वरिष्ठ या संबंधाने एकमेकांच्या संपर्कात आहेत. कार्यालयीन वरिष्ठांकडून अमित नेहरा यांच्या नातेवाइकांना माहिती कळविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे बंधू हरियाणातून नागपूरकडे निघाले आहे.

 

घटनास्थळी तहसीलदार योगेश देशमुख, ठाणेदार अमूल बच्छाव, राज्य राखीव पोलीस बल समादेशक हर्ष पोदार यांच्या आदेशाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, पोलीस निरीक्षक मारुती नेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शोध व बचाव पथकाचे देवानंद भुजाडे, कौस्तुभ वैद्य, भूषण वैद्य, सचिन धमरकर, गजानन वाडेकर, हिरालाल पवार, पंकज येवले, महेश मांदाळे, अजय आसोले उपस्थित आहेत.

क्रेनने नदीपात्रातून काढली कार

सायंकाळी पाच वाजता क्रेन बोलावून कार नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली व त्यानंतर सरळ करण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर लॉक झालेल्या या कारची दारे उघडण्याची कार्यवाही पोलिसांकडून करण्यात येत होती. कार बुडाल्याची वार्ता कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. भामोद फाट्यावरून २०० मीटर अंतरावर हे घटनास्थळ आहे.

टॅग्स :Deathमृत्यू