शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्ल्यू व्हेल गेम’ निव्वळ ‘बागुलबुवा’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:43 IST

‘ब्ल्यू व्हेल गेम’ च्या परिणामांमुळे अख्खा देश ढवळून निघतो आहे. पालकांमध्ये चिंता वाढली आहे. तर विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. या खेळामुळे पसरत असलेल्या अफवांमुळे, नेमका हा गेम काय आहे, ...

ठळक मुद्देसायबर तज्ज्ञांचे मत : आत्महत्या केलेल्यांकडून एकही पुरावा आढळला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘ब्ल्यू व्हेल गेम’ च्या परिणामांमुळे अख्खा देश ढवळून निघतो आहे. पालकांमध्ये चिंता वाढली आहे. तर विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. या खेळामुळे पसरत असलेल्या अफवांमुळे, नेमका हा गेम काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सायबर तज्ज्ञ उत्सुक आहे. इंटरनेटवर याचा शोध घेतला असता हा गेमच उपलब्ध नसल्याचे सायबर तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे हा गेम निव्वळ बागुलबुवा असल्याचे मत सायबर लिगल क न्सलटंट अ‍ॅड. महेंद्र लिमये यांचे आहे.ब्ल्यू व्हेल गेमच्या दुष्परिणामांचा होत असलेला प्रसार लक्षात घेता, अ‍ॅड. लिमये यांच्याकडे पालकांकडून विचारणा व्हायला लागली आहे. पालकांनी चिंता व्यक्त केली आहे, आम्ही काय करायचे. भारतात या खेळामुळे पहिली आत्महत्या २३ जुलै २०१७ झाल्याची नोंद आहे. त्यानंतर ३ सप्टेंबरपर्यंत वेगवेगळ्या राज्यात ब्ल्यू व्हेल गेममुळे आत्महत्या झाल्याची नोंद आहे. मुंबईमध्ये एका १४ वर्षाच्या मुलाने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. ही आत्महत्या ब्ल्यू व्हेल गेममुळे झाल्याची चर्चा पसरली. परंतु पोलिसांकडून त्याला दुजोरा मिळाला नाही. ब्ल्यू व्हेल गेमच्या दुष्परिणामामुळे सरकारसुद्धा सतर्क झाली आहे. मात्र याचे मूळच उपलब्ध नसल्याने, याची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही.अ‍ॅड. लिमये यांनी ब्ल्यू व्हेल गेम डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु गेमची वेबसाईटच नसल्याने हा गेम डाऊनलोडच होत नाही. शाळांमध्ये अनेक विद्यार्थ्यांकडे ब्ल्यू व्हेल गेमबद्दल माहिती मागितली. कुणाचकडे हा गेम उपलब्ध नाही. उलट विद्यार्थ्यांना या गेमबद्दल उत्सुकता दिसून आली. मुळात ज्या आत्महत्या झाल्या त्यातूनही या गेमसंदर्भात कुठलीही लिंक मिळाली नाही. हा गेम असेल तर त्याचा अ‍ॅडमिनिस्टेटर सरकारने शोधला पाहिजे. या गेमची कुठे लिंक नाही, इंटरनेटवर उपलब्ध नाही. याचाच अर्थ हा प्रकार निव्वळ भीती दाखविण्याचा आहे.इंटरनेट अ‍ॅडिक्शनची भीतीमुलांमध्ये इंटरनेटचे प्रचंड आकर्षण आहे. मुलांसाठी हे प्रचंड भीतीदायक आहे. त्यासाठी पालकांनी सतर्क राहायला हवे. ब्ल्यू व्हेल गेममुळे मुलांनी आत्महत्या केली. परंतु या गेमचे ५० टास्क आहे. शेवटचा टास्क आत्महत्येचा आहे. या दरम्यान पालकांना काहीतरी लक्षात तर येऊ शकते. खरेतर पालकांनी मुलांना इंटरनेट उपलब्ध करून देताना, मुले खरंच त्यातून आपल्या अभ्यासाचा शोध घेतात की, अन्य काही याकडे लक्ष ठेवले पाहिजे, असे अ‍ॅड. लिमये म्हणाले.२३ सप्टेंबरला पालकांसाठी सेमिनारब्ल्यू व्हेल गेमची दहशत पालकांमध्ये पसरली आहे. यातून पालकांना बाहेर काढण्यासाठी पोलीस विभागाच्या मदतीने २३ सप्टेंबरला इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअर्सच्या सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता यासंदर्भात सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.