शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
2
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
3
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
4
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
5
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
6
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
7
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
8
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
9
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
10
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
12
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
13
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
14
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
15
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
16
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
17
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
18
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
19
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
20
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी

शरिरात रक्त गाेठणे हे तरुणांमधील हृदयघाताचे माेठे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:08 IST

मेहा शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काेराेना विषाणूचा संसर्ग हा प्रतिकार शक्तीवर परिणाम करणारा असून, यामुळे रुग्णाच्या शरिरात ...

मेहा शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काेराेना विषाणूचा संसर्ग हा प्रतिकार शक्तीवर परिणाम करणारा असून, यामुळे रुग्णाच्या शरिरात रक्त गाेठण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारामुळे काेराेना रुग्णांमध्ये हृद्यघाताची शक्यता बळावली आहे. आजारातून बरे झाल्यानंतरही महिन्याभराच्या कालावधीत पाेट किंवा पायामध्ये रक्ताच्या गाठी हाेण्याची शक्यता असते. तरुण रुग्णांमध्येही हृदयघाताचे हे प्रमुख कारण असल्याची माहिती प्रसिद्ध हृदयराेगतज्ज्ञ डाॅ. जसपाल अर्नेजा यांनी दिली. ‘लाेकमत’शी बाेलताना त्यांनी काेराेना महामारी, बरे झाल्यानंतर घेण्याची काळजी व इतर महत्त्वपूर्ण विषयांवर प्रकाश टाकला.

काेराेनाच्या औषधामुळे भविष्यात हृदयावर रिॲक्शन हाेण्याची शक्यता काय?

डाॅक्टर उपचारासाठी तीन प्रकारचे औषध वापरतात. पहिले म्हणजे विषाणूराेधी ‘फॅबिपिरावल’ हे एक ॲन्टिव्हायरल औषध आहे, जे गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांना दिले जाते. हाच प्रकार ‘रेमडेसिविर’बाबतही आहे. डब्ल्यूएचओ आणि एम्सनुसार प्रत्येक रुग्णाला ही औषधे देण्याची गरज नाही. ‘एम्स’ने रेमडेसिविरला आरक्षित ड्रग म्हणून ठेवले आहे. हे चमत्कार घडविणारे किंवा सिद्धता असलेले औषध नाही, हे नागरिकांना पटवून देणे गरजेचे आहे. अतिसंसर्ग झालेल्या रुग्णांना पहिल्या ३ ते ५ दिवसात हे औषध दिले तरच त्याचा फायदा मिळू शकताे. या औषधाचे अधिक साईड इफेक्टही नाहीत. दुसरे औषध म्हणजे स्टेराईड पण ते प्रत्येक रुग्णाला देणे शक्य नाही. स्टेराईड त्याच रुग्णांना दिले जाते, जे रुग्णालयात भरती आहेत व ज्यांचा ऑक्सिजन स्तर ९२च्या खाली घसरला आहे. या औषधाने रुग्ण बचावाचा दर वाढवला आहे आणि गुंतागुंतही कमी केली आहे. स्टेराईडमुळे साईड इफेक्ट हाेतात पण एक किंवा दाेन आठवडे या अत्यंत कमी कालावधीसाठी दिले जात असल्याने साईड इफेक्ट हाेण्याची शक्यता कमी आहे. स्टेराईडमुळे मधुमेही असलेले किंवा नसलेल्या रुग्णांचीही शुगर लेव्हल वाढण्याची शक्यता आहे. ते महत्त्वाचे औषध आहे. तिसरे महत्त्वाचे औषध आहे जे रुक्ताच्या गाठी हाेण्यापासून राेखू शकते. रक्तगाठी विरघळवणाऱ्या या औषधाने मृत्यूदरही कमी केला आहे. आम्ही रुग्णाचा ‘डि-डायमर’ स्तर तपासताे. तो वाढला असेल तर रुग्णाला किमान महिनाभरासाठी गाठी विरघळवणारे हे औषध दिले जाते.

रेमडेसिविरवरून घबराट का निर्माण झाली आहे?

साेशल मीडिया आणि वृत्त वाहिन्यांनी विनाकारण गवगवा केल्यानेच रुग्णांकडून रेमडेसिविरची मागणी वाढली आहे. पहिली लाट ओसरताच औषध कंपन्यांनी त्याचे उत्पादन बंद केले. मात्र, पुन्हा एवढ्या माेठ्या प्रमाणात रुग्णवाढ हाेईल, याची अपेक्षाही कुणी केली नव्हती. मात्र, आता उत्पादन वाढविण्यात आले आहे आणि येत्या एक-दाेन आठवड्यात परिस्थिती सुधारेल, असा विश्वास आहे.

नागरिकांचे चक्कर येऊन पडण्याचे व मृत्यू ओढवण्याचे प्रकार का वाढले?

अशा नागरिकांमध्ये रक्तगाठी येण्याचे प्रमाण अधिक असते. वाॅशरुममध्ये ताण दिल्यामुळे पायातील गाठी फुप्फुसाच्या नलिकांमध्ये जातात व अकस्मात मृत्यू येण्याचीही शक्यता असते. याला ‘पल्माेनरी एम्बाॅलिझम’ असे म्हटले जाते. गाठींमुळे हार्ट ॲटॅक येण्याचीही शक्यता आहे.

ऑक्सिजनसाठी एवढा संघर्ष का करावा लागत आहे?

काेराेनाची दुसरी लाट ही त्सुनामीप्रमाणे आली आणि तिच्या प्रभावाचे आकलन करण्यात आपण कमी पडलाे. ऑक्सिजनची गरज एवढ्या माेठ्या प्रमाणात वाढेल, याची अपेक्षाही केली नव्हती. ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी स्थानिक प्रशासन खूप चांगले काम करत आहे व प्रत्येक रुग्णालयाची गरज भागवली जात आहे.

सध्या आपण काेराेनाच्या काेणत्या परिस्थितीत आहाेत?

सध्या देशात साडेतीन लाख रुग्णसंख्या आहे आणि मेच्या मध्यापर्यंत ५ ते ६ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा ग्राफ खाली येईल.

समस्त लाेकसंख्येचे लसीकरण शक्य आहे?

पुढील वर्षापर्यंत काेराेना जाण्याची शक्यता नाही आणि यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. सरकारनेही लसीच्या आयातीला परवानगी दिली आहे. दर महिन्याला १० काेटी लस मिळतील आणि देशात ४५ ते ५० काेटी नागरिकांचे लसीकरण शक्य हाेईल. पाेलिओप्रमाणे ही माेहीम राबवावी लागेल.