शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

ब्लॉकबस्टर, सुपरहिट गीतांच्या नागपूरकर जनकाचा ‘सांगीतिक’ गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 23:43 IST

नागपूरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल शासनातर्फे दिला जाणारा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम-लक्ष्मण यांना जाहीर झाला. विजय पाटील हे मूळचे नागपूरचे. याचा सार्थ अभिमान नागपूरकरांना आहे.

ठळक मुद्देविजय पाटील ऊर्फ राम-लक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर‘हम से बढकर कौन’ ते ‘हम आपके है कौन’पर्यंतची ऐतिहासिक कारकीर्द

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल शासनातर्फे दिला जाणारा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम-लक्ष्मण यांना जाहीर झाला. विजय पाटील हे मूळचे नागपूरचे. याचा सार्थ अभिमान नागपूरकरांना आहे.विजय काशीनाथ पाटील त्यांचे पूर्ण नाव. नागपुरातील उंटखाना वसाहतीत १६ सप्टेंबर १९४२ रोजी त्यांचा जन्म झाला. वडील काशीनाथ आणि काका प्रल्हाद पाटील यांच्या संगीताचा वारसा त्यांना मिळाला. लहानपणापासून हार्मोनियम वाजविण्याची त्यांना आवड होती. उंटखाना येथील महानगरपालिकेच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. बारावीपर्यंतचे शिक्षण जी.एस. वाणिज्य महाविद्यालयातून घेतले. त्यांची संगीताबद्दलची आवड पाहत काकांनी शास्त्रीय संगीताच्या शिक्षणासाठी धंतोली येथील भातखंडे संगीत संस्थेत टाकले. त्यांना ‘अकॉर्डियन’ वाजविण्याची मोठी आवड होती. याच ‘अकॉर्डियन’वर त्यांनी आयुष्याचे पहिले गाणे संगीतबद्ध केले. यातूनच त्यांना ‘आॅर्केस्ट्रा’ची कल्पना सुचली. नागपुरातीलच नव्हे तर मध्यभारतातील पहिला ‘कलाकरन’ नावाचा आॅर्केस्ट्रा तयार केला. संगीत क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी त्यांना मुंबई खुणावत होती. स्वत:च्या हिमतीवर मुंबई गाठली. सुरुवातीचा प्रवास खडतर राहिला. त्या स्थितीतही मुंबईत ‘अमर विजय’ या नावाने आॅर्केस्ट्राची सुरुवात केली. एकदा दादा कोंडके यांची नजर राम लक्ष्मण यांच्या कार्यक्रमावर पडली आणि त्यांनी १९७४ साली ‘पांडू हवालदार’ या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून निवड केली. येथूनच त्यांच्या संगीताच्या प्रवासाला सुरुवात झाली. राम कदम यांच्यासोबत जोडी जमवून त्यांनी दादा कोंडके यांच्या अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांना संगीत दिले. दादांकडून त्यांना संगीतातील अनेक बारकावे शिकायला मिळाले. १९७६ पर्यंत राम कदम व विजय पाटील ही जोडी 'राम-लक्ष्मण' या नावाने संगीत द्यायचे. १९७७ मध्ये राम कदम यांचे निधन झाल्यानंतरही विजय पाटील यांनी 'राम-लक्ष्मण' या नावानेच संगीत देणे सुरू ठेवलं. 'हम से बढकर कौन' चित्रपटातले 'देवा हो देवा गणपती देवा' या गाण्यानं त्यांना प्रसिद्धी मिळाली. परंतु प्रचंड लोकप्रियता मिळाली ती १९८९ मध्ये आलेल्या ‘मैने प्यार किया’ चित्रपटातून. या चित्रपटाचे सुपरहिट संगीत जनमानसाच्या मनामनात बसले. त्यानंतर आलेल्या ‘हम आपके है कौन’या चित्रपटाच्या यशामुळे राम लक्ष्मण यांचे नाव इतिहासात कायमचे नोंदल्या गेले.त्यांनी हिंदी, मराठी, भोजपुरी अशा १५० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले. 'अंजनीच्या सुता तुला', 'खेळ कुणाला दैवाचा कळला', 'जीवन गाणे गातच रहावे', 'झाल्या तिन्ही सांजा करून', 'पिकलं जाभूळ तोडू नका' या त्यांच्या गाण्यांनी मराठी मनावर अधिराज्य निर्माण केलेलं आहे.राम लक्ष्मण यांची कारकीर्द घडण्यात लता मंगेशकर यांचा मोठा वाटा आहे. मराठी माणूस म्हणून त्यांच्याबदल आपुलकी वाटत असावी. लता मंगेशकर यांनी चित्रपटातील गाणी कमी केल्यानंतरही राम लक्ष्मण यांच्यासाठी गाण्यास कधीही नकार दिला नाही. आज त्यांच्याच नावाचा सर्वश्रेष्ठ संगीताचा पुरस्कार जाहीर झाला. यापेक्षा मोठा आनंद कोणताच नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.-पुरस्कारने स्मृतीचे पुनरुज्जीवन झालेज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण म्हणाले, संगीत क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल लता मंगेशकर पुरस्कार जाहीर केल्याबद्दल शासनाचे मनपासून आभार. आजही माझ्या गाण्याचे अधिराज्य आहे, हे यातून सिद्ध होतेय. लोकांनी मला नेहमीच प्रेम दिलं आणि हे प्रेम कायम ठेवावं, ही इच्छा आहे. या पुरस्काराने स्मृतीचे पुनरुज्जीवन झाले. पुरस्काराच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते दादा कोंडके यांची आठवण येत असल्याचेही ते म्हणाले.

 

टॅग्स :musicसंगीतLata Mangeshkarलता मंगेशकर