शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मार्गात अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 23:47 IST

महापालिका क्षेत्रातील भरतवाडा, पुनापूर, पारडी आणि भांडेवाडी परिसरातील १७३० एकर क्षेत्रात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला जात आहे . स्थानिक नागरिकांचा विरोध होत असल्याने स्मार्ट सिटीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपुनर्वसन व जमीन अधिग्रहणाचा प्रश्न : विकास आराखड्याला नागरिकांचा विरोध : मनपापुढे निधीची समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका क्षेत्रातील भरतवाडा, पुनापूर, पारडी आणि भांडेवाडी परिसरातील १७३० एकर क्षेत्रात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला जात आहे. यात वीज , पाणी, सिवेज ,रस्ते, हॉस्पिटल, शिक्षण अशा उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा करण्यात येणार आहे. तसेच. प्रदूषणमुक्त वातावरण, चांगल्या दर्जाची परिवहन सेवा, उद्यान व हिरवळ, कौशल्य विकास कें द्र, ग्रंथालय, दहनघाट यासह अन्य बाबींचा यात समावेश आहे. परंतु या प्रकल्पाच्या विकास आराखड्याला काही स्थानिक नागरिकांचा आक्षेप आहे. याचा जमीन अधिग्रहण व पुनर्वसनाच्या कामावर परिणाम झाला आहे. स्थानिक नागरिकांचा विरोध होत असल्याने स्मार्ट सिटीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे.भरतवाडा, पुनापूर, पारडी आणि भांडेवाडी परिसरातील ११ हजारांहून अधिक बांधकामे बाधित होणार आहेत. विकास आराखड्यात प्रशस्त रस्ता तयार करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने रुंदीकरण अपेक्षित होते. परंतु काही भागात एकाच बाजूने रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याने नागरिकांचा विरोध होत आहे. आराखडा तयार करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्याची गरज होती. फे ब्रुवारी महिन्यात पारडी येथील भवानी मंदिराच्या सभागृहात सुनावणी घेताना स्थानिक नागरिकांना तक्रारी करण्याची संधी मिळाली नसल्याचा सूर्यनगर भागातील नागरिकांचा आक्षेप आहे.पूर्व नागपुरातील नेताजीनगर, सुभान नगर, भारत नगर, रघुवंशीनगर, म्हाडा कॉलनी, गौरी नगर, गुलमोहर नगर,जय गंगा मॉ हाऊ सिंग सोसायटी, नवीन नगर, पुनापूर यासह अन्य वस्त्यांचा स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणत्या वस्त्यातील किती घरे प्रकल्पामुळे बाधित होणार आहे. रस्त्यात किती जणांची घरे तोडावी लागणार आहे याबाबत अद्याप नागरिकांना माहिती देण्यात आलेली नाही. या भागात मागील अनेक वर्षापासून नागरिक वास्तव्यास असून प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन कुठे आणि कसे करणार याबाबतही नागरिकांना माहिती नसल्याने संभ्रम आहे.विशिष्ट भागाचा विकासस्मार्ट सिटी होण्यासाठी मोठे व समतल रस्ते, सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. परंतु नागपूर शहरात २६०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. सिमेंट रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण नाही. अनेक रस्ते समतल नाही. बहुसंख्य डांबरी रस्ते पावसाळ्यात उखडतात. शहरातील मोकाट जनावरे वाहतुकीला बाधा निर्माण करीत आहे. त्यामुळे शहराच्या ठराविक भागाचा विकास करून स्मार्ट सिटी होणार नाही.मनपा आर्थिक भार कसा उचलणार?स्मार्ट सिटी प्रकल्पावर ३३५१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून यासाठी एक हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन व नासुप्रचाही यात वाटा राहणार आहे. परंतु महापालिकेलाही वर्षाला ५० कोटीचा भार उचलावा लागणार आहे. दोन वर्षापूर्वी राज्य सरकारने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. याचा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. बिकट आर्थिक परिस्थिती विचारात घेता महापालिका आर्थिक भार कसा उचलणार हा प्रश्नच आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Muncipal Planning Development Authorityनागपूर महानगर नियोजन विकास प्राधिकरण