शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
2
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
3
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं करण कळताच पती हादरला!
4
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
5
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
6
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
7
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
8
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
9
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
10
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
11
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
12
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
13
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
14
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
15
Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
16
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
17
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
18
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
19
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
20
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

अपक्षांची भरमार; मतांचा दुष्काळ

By admin | Updated: October 28, 2014 00:21 IST

निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची भरमार होती. शहरातील सहा विधानसभा क्षेत्रात तब्बल ५५ अपक्ष निवडणुकीत उभे होते. यातील दोन उमेदवार वगळले तर इतरांना मतांची चार अंकी संख्या गाठता आलेली नाही.

शहरात ५५ अपक्ष उमेदवार : मते मिळाली ३७७४३नागपूर : निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची भरमार होती. शहरातील सहा विधानसभा क्षेत्रात तब्बल ५५ अपक्ष निवडणुकीत उभे होते. यातील दोन उमेदवार वगळले तर इतरांना मतांची चार अंकी संख्या गाठता आलेली नाही. यातील काही उमेदवारांची मते अंकी आकड्याच्या पुढे सरकली नाही. मतदारांनी दुर्लक्ष केल्याने अपक्षांच्या खात्यात मतांच्या दुष्काळ होता.शहरातील सहा विधानसभा मतदारसंघातील ११७ पैकी ५५ उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. यातील दक्षिण नागपूर मतदारसंघातील शेखर सावरबांधे यांना मिळालेली १५,१०७ व मध्य नागपुरातून आभा पांडे यांना मिळालेली ४४४९ मते वगळता इतर कोणत्याही अपक्ष उमेदवाराला हजारचा पल्ला गाठता आलेला नाही. उत्तर नागपूर मतदारसंघात २० उमेदवारापैकी ९ उमेदवार उपक्ष होते. अपक्षांंना मिळालेल्या मताची बेरीज ३०१० इतकी आहे. पश्चिम नागपूर मतदारसंघातही अशीच परिस्थिती बघायला मिळाली. २३ पैकी ७ उमेदवार अपक्ष होते. त्यांना एकूण १६३५ मते मिळाली.मध्य नागपूर मतदारसंघातील २० उमेदवारांपैकी १४ उमेदवार अपक्ष होते. त्यांना २०५१ मते मिळाली. यातील ५ जणांना १०० पेक्षा कमी मते मिळाली. पूर्व नागपूर मतदारसंघात २० उमेदवारांनी नशीब अजमावले. यात १० अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. त्यांना ५१४९ मते मिळाली. यात आभा पांडे यांच्या ४४४९ मतांचा समावेश आहे. ही मते वगळली तर ९ अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज हजारच्या आत आहे. दक्षिण नागपूर विधानसभा निवडणुकीत १८ उमेदवार उभे होते. यात ८ अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. अपक्षांना १,७३,३३९ मते मिळाली. यात शेखर सावरबांधे यांच्या १५१०७ मतांचा समावेश आहे. पश्चिम नागपूर मतदारसंघात १६ उमेदवारांनी नशीब अजमावले यात ७ अपक्ष उमदेवारांचा समाावेश होता. अपक्षांना १५५९ मते मिळाली. निवडणुक ीत मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार रिंगणात असले तरी बहुसंख्य अपक्ष उमेदवारांना ५०० पेक्षा कमी मते मिळालेली आहेत. यावरून त्यांची लोकप्र्रियता किती आहे, याची जाणीव त्यांना झाली असेलच. (प्रतिनिधी)