शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंधळ्या वाटेवरचा आंधळा प्रवास आहे .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:42 IST

शब्दागणिक अर्थाचे झाले वाद आहे... आंधळ्या वाटेवरचा आंधळा प्रवास आहे... देवावरील माणसाची भक्ती जर आंधळीच आहे... मग डोळसांची दृष्टी आमच्या बाबतीत का वेगळी आहे... अशा गंभीर आशयाच्या आणि जगण्यातून सोसलेल्या दु:खाच्या भावनाप्रधान कविता तिसऱ्या राज्यस्तरीय अंध व अपंग साहित्य व कला संमेलनात दिव्यांग व सामान्य कवींनी सादर केल्या.

ठळक मुद्देकविसंमेलनातून कवींनी व्यक्त केल्या भावना : निसर्ग, प्रेम आणि वेदनांचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शब्दागणिक अर्थाचे झाले वाद आहे... आंधळ्या वाटेवरचा आंधळा प्रवास आहे... देवावरील माणसाची भक्ती जर आंधळीच आहे... मग डोळसांची दृष्टी आमच्या बाबतीत का वेगळी आहे... अशा गंभीर आशयाच्या आणि जगण्यातून सोसलेल्या दु:खाच्या भावनाप्रधान कविता तिसऱ्या राज्यस्तरीय अंध व अपंग साहित्य व कला संमेलनात दिव्यांग व सामान्य कवींनी सादर केल्या.कवयित्री राधा बोर्डे स्मृती कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून काशिनाथ महाजन व प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत उपस्थित होते. कवी संमेलनाची सुरुवात कवयित्री मीनल येवले यांनी ‘वाट माझी साधी सरळ, कधीच सरत नाही...’ या कवितेने केली. भारती दवणे यांनी ‘अनेक काटे मार्गात असले तरी, मी जगणार आहे...’ अशी प्रेरणादायी कविता सादर केली. सोनम चौधरी यांनी आई-वडिलांची थोरवी गाणारी कविता सादर केली. गणेश पांडे यांनी ‘फुल जरी होऊ शकला नाही, काटा होऊ नकोस’ या आशयाची ‘मानसा’ ही कविता सादर केली. राजेश मारोतकर यांनी ‘चेहरे आरशांचे धुवायचे राहिले...’ या आशयाची कविता सादर करून सामाजिक वेदनेची जाणीव करून दिली. गजानन मानकर यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर, भूपेश नितनवरे यांनी ‘हाय यावी नेमकी का याद आता...’ ही कविता सादर केली. अंध कवी रामराव जंजाळ यांनी ‘निसर्गाच्या सौंदर्याचा भाव जाणून घ्यावा’ या कवितेतून निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य प्रकट केले. राकेश पावरा यांनी ‘थोडे समजून घे रे...’ रमेश बगे यांनी ‘आंधळ्या वाटेवरचा आंधळा प्रवास आहे...’ या कविता सादर केल्या. सुरेखा रडके यांनी ‘आई मला जन्म नवा घेऊ दे...’, विद्याधर बन्सोड यांनी ‘दिवा माझा असेलच, फक्त तुझी वात दे...’ अशा वेगवेगळ्या आशयाच्या कविता, नज्म, शायरी यावेळी राजेश आसुदानी, शेषराव धांडे, रुपकिशोर कनोजिया, बाळकृष्ण राऊत, प्रशांत ढोले, प्रदीप देशमुख यांच्यासह अनेकांनी सादर केल्या. कविसंमेलनाचे संचालन डॉ. बळवंत भोयर यांनी केले. सर्व कवींना आमदार प्रकाश गजभिये यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.ये बिल बहुमतो से हो जाये सँगशनसरकार लागू करते अमिरो को पेंशन, और दे दे जहर गरीबो को, की मिट जाये टेंशन, भारत के लिडरो है अर्ज की, ये बिल बहुमतो से हो जाये सँगशन... गरीबांची वेदना सरकार दरबारी अतिशय मार्मिक शब्दात या कविसंमेलनात जमिल अन्सारी यांनी पोहचविली.

 

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर