शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंध, अपंगांचे साहित्य व कला संमेलन १७ व १८ नोव्हेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 01:10 IST

अंध व अपंगांचे तिसरे राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलन येत्या १७ व १८ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आले आहे. आमदार निवास येथे होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लेखक अनंत ढोले यांची निवड झाली असून, उदघाट्नप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार प्रकाश गजभिये यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देअनंत ढोले संमेलनाध्यक्ष : सुप्रिया सुळे येणार

नागपूर : अंध व अपंगांचे तिसरे राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलन येत्या १७ व १८ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आले आहे. आमदार निवास येथे होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लेखक अनंत ढोले यांची निवड झाली असून, उदघाट्नप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार प्रकाश गजभिये यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.समाजोत्थान अंध व अपंग सामाजिक कल्याणकारी संस्था आणि राष्ट्रीय विकलांग कल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अंध व अपंगांच्या साहित्यकृती, कलाविष्कार व अभिव्यक्तीला हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी समाजोत्थान संस्थेतर्फे गेल्या तीन वर्षापासून हे संमेलन होत आहे. दोन दिवसीय संमेलनामध्ये परिसंवाद, प्रकट मुलाखत, विविध कलादर्शन, कवी संमेलन, कथाकथन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. संमेलनाला राज्यभरातून ५०० च्यावर अंध व अपंग मान्यवर कवी, लेखक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते व सहयोगी संस्था सहभागी होणार असल्याचे गजभिये यांनी स्पष्ट केले. कवी त्र्यंबक मोकासरे यांच्या अध्यक्षतेत चंद्रपूरला पहिले तर कवी काशीनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेत जळगाव येथे दुसरे संमेलन घेण्यात आले होते. संमेलनासाठी अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनाही आमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला संस्थेचे संस्थापक सचिव रेवानंद मेश्राम, रणजित जोशी, डॉ. बळवंत भोयर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Prakash Gajbhiyeप्रकाश गजभियेnagpurनागपूर