शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुंडांना नेत्यांचा आशीर्वाद

By admin | Updated: September 18, 2015 02:47 IST

उपराजधानातील गुन्हेगार आता नेत्यांच्या अगदी जवळचे झाल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांवर टाकतात दबाव : कारवाई होणार तरी कशी? नागपूर : उपराजधानातील गुन्हेगार आता नेत्यांच्या अगदी जवळचे झाल्याचे दिसून येत आहे. गुंडांना नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे बुधवारी दुपारी फ्रेण्ड्स कॉलनी येथे एका प्राध्यापकाच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून याप्रकारच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. गुन्हेगारांना संरक्षण देण्याचे काम नेतेमंडळी करीत असल्याने पीडित व्यक्ती तक्रार दाखल करायला पुढे येत नाही. एखाद-दुसरे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेच तर त्यांना सुद्धा परत पाठविण्याची व्यवस्था केली जाते. बुधवारी गँगस्टर सुमित ठाकूर याने फ्रेण्ड्स कॉलनी येथील एका प्राध्यापकाच्या कारला स्वत:च धडक दिली होती आणि प्राध्यापकालाच नुकसान भरपाई मागितली होती. नुकसान भरपाई न दिल्याच्या कारणावरून प्राध्यापकाला मारहाण केली आणि त्यांच्या कारची तोडफोड केली. सुमित हा भाजपा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष आहे. हे प्रकरण ठाण्यात पोहोचल्यावर माफिया भाजपा पदाधिकाऱ्याने प्राध्यापकावर दबाव टाकून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले होते.याच धर्तीवर कॉटन मार्केटमधील एक गँगस्टर सुद्धा उपराजधानीत दहशत पसरवित आहे. या गँगस्टरचे साथीदार गुन्हे शाखा पोलिसांची प्रतिमा उज्ज्वल बनवण्यासाठी सुद्धा प्रयत्नरत आहेत. काही दिवसंपूर्वी गुन्हे शाखा पोलिसांनी एका चर्चित गुन्हेगाराला पकडले होते. त्याची माहिती देण्यात हा गँगस्टरच सक्रिय होता. हा गँगस्टर विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाच्या दोन नेत्यांच्या अगदी खास झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या जनता दरबारातही त्याने हजेरी लावली होती. सीताबर्डीतील भरत खटवानीसह अनेक चर्चित प्रकरणात या गँगस्टरचे नाव आले आहे. परंतु तो नेहमीच सहीसलामत सुटला. ज्याचे महत्त्व काही दिवसांपासून अचानकपणे वाढले आहे, अशा भाजपच्या एका नेत्याचे नाव हा गँगस्टर नेहमी घेतो. याच नेत्याने त्याला एम्प्रेस मॉलमघील पब मालकाकडून खंडणी वसुली करण्याच्या प्रकरणात गणेशपेठ पोलिसांपासून वाचवले होते. शहर पोलिसातील काही अधिकाऱ्यांनाही ही गोष्ट माहीत आहे. ते योग्य संधीच्या शोधात आहेत. एका माजी क्रिकेटपटू तरुणाला धमकावण्याच्या प्रकरणात सहभागी असलेला बुकीसुद्धा नेत्यांशी जुळलेला आहे. खामल्यातील गोलू आणि प्रतापनगरातील तपन नेहमीच भाजप नेत्यांसोबत फिरतांना दिसतात. गुन्हे शाखा पोलिसांनी सट्टेबाजीच्या वसुलीसाठी क्रिकेटपटूला धमकावल्याच्या प्रकरणाचा तपास सुरु करताच नेते सक्रिय झले होते. त्यांनी तरुणाला व त्याच्या कुटुंबीयांना प्रकरण मिटविण्यासाठी बाध्य केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला आहे. (प्रतिनिधी)