शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

नागपूर जिल्ह्यातील मानस अ‍ॅग्रो प्रा.लि. या साखर कारखान्यात ब्लास्ट; वेल्डरसह पाच कामगारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 18:38 IST

नागपूर: जिल्ह्यातील बेला (ता.उमरेड) येथील मानस अ‍ॅग्रो प्रा.लि. साखर कारखान्यात बायोगॅसच्या टँकवरील भागात ब्लास्ट झाल्याने तिथे काम करित असलेल्या वेल्डरसह पाच कामगारांचा (हेल्पर) घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. शनिवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: बायोगॅस प्रकल्पात गॅसवेल्डींगने डागडुजी करीत असतानाच स्फोट झाल्याने पाच कंत्राटी कामगारांचा जागीच मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील बेला (ता.उमरेड) येथील मानस अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात शनिवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये मंगेश प्रभाकर नौकरकर (२३), वासुदेव विठ्ठल लडी (३४), लीलाधर वामन शेंडे (४६), सचिन प्रकाश वाघमारे (२७), प्रफुल्ल पांडुरंग मून (२५) सर्वच रा. वडगाव ता. उमरेड अशा एकूण पाच कामगारांचा समावेश आहे. पूर्वाश्रमीच्या पूर्ती साखर कारखान्यातील ही घटना असून पाचही कामगार एकाच गावातील शेजारीच वास्तव्याला होते. यामध्ये सचिन वाघमारे हा वेल्डर होता.

बेला येथे मानस अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात बायोगॅस मोलॅसिस उत्पादन टँक आहे. ही टँक ६० लाख लिटर क्षमतेची असून उसाच्या मळीपासून सेंट वॉश पदार्थ काढला जातो. त्यापासून बायोगॅस तयार केला जातो. विद्युत निर्मितीसाठी हा बायोगॅस उपयोगी ठरतो.    सहा महिन्यापासून या ठिकाणी काम बंद होते. कारखान्यात मेंटेनन्सचे काम काही दिवसांपासून सुरू करण्यात आले. या कामाचे कंत्राट संजय इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे पाच कंत्राटी कामगार कामावर आले. सदर बायोगॅस प्रकल्पात वेल्डींगच्या माध्यमातून डागडुजीचे कार्य सुरू होते. अशातच बायोगॅसचा स्फोट झाला. पाचही कामगारांचे मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत होते. दोन कामगारांचे प्रेत टँकच्या खाली पडले तर अन्य तीन कामगारांचे मृतदेह टँकच्या परिसरात दिसून आले. शेवटच्या टप्प्यातच काम सुरू असताना हृदय हेलावून टाकणारी ही घटना घडली. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी तसेच मृत कामगारांच्या कुटुंबीयांना मदत केली जावी, अशी वडगाव येथील नागरिकांची मागणी आहे.

पोलीस अधीक्षक स्पॉटवर

बेला येथील घटनेची माहिती कळताच नागपूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी हिरामण झिरवाळ, प्रभारी पोलीस निरीक्षक राजश्री पाटील आदींसह पोलीस ताफा होता. वृत्त लिहिस्तोवर पंचनामा सुरू होता. योग्य तपासाअंती नियमानुसार कारवाईचे संकेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले.बेला, वडगाव हादरलेबेला येथून केवळ एक किलोमीटर अंतरावर वडगाव आहे. या ठिकाणी सुमारे १२५ घरांची वस्ती असून, पाचही मृत शेजारीच होते. यामुळे सोबतच कंपनीत जाणे-येणे असायचे. पाचही कुटुंबातील कर्ते पुरुष गेल्याने कुटुंबीय अस्वस्थ झाले आहेत. एकाच गावातील पाच जणांचा असा हकनाक बळी गेल्याने वडगाव, बेला हादरले.

टॅग्स :Blastस्फोटSugar factoryसाखर कारखाने