शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

नागपुरातील स्फोट, अन् गडकरींची संवेदनशीलता; स्वागत रॅली केली रद्द

By योगेश पांडे | Updated: June 13, 2024 20:19 IST

गडकरी यांनीच यासंदर्भात आवाहन केले होते.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : अमरावती मार्गावरील चामुंडी एक्सप्लोजिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटातील जीवहानीनंतर राजकीय वर्तुळातूनदेखील शोक व्यक्त करण्यात आला. केंद्रीय मंत्रीपदी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर नागपुरात परत येत असल्याने नितीन गडकरी यांची गुरुवारी भव्य स्वागत रॅली निघणार होती. मात्र या स्फोटामुळे ती रॅली रद्द करण्यात आली. गडकरी यांनीच यासंदर्भात आवाहन केले होते.

गडकरी यांच्या स्वागतासाठी सायंकाळी पाच वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावरून भव्य रॅली निघणार होती. त्यासंदर्भात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संदेश देण्यात आले होते. मात्र या स्फोटाची बातमी कळताच गडकरी यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला व स्वागत उत्सव स्थगित करावा असे आवाहन केले. या स्फोटात कामगारांचा मृत्यू झाल्याची बाब दुर्दैवी आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. मृतक व जखमींच्या शोकाकुल कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य लाभावे हीच प्रार्थना असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणार : फडणवीस

या स्फोटाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिस आयुक्तांशी मी संपर्कात असून, जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक ती सर्व मदत पुरविली जात आहे. पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात भेट दिली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी