शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

रस्त्यावर थंडीत कुडकुडणाऱ्यांना मायेची उब देणारे 'ब्लँकेटदूत'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:32 IST

उन्हाळा, पावसाळ्यात वेगवेगळ्या रूपाने गरीब, निराधारांना मदत करणारे डॉ. आशिष अटलोए हिवाळ्याच्या दिवसांत ‘ब्लँकेटदूत’ म्हणून पुढे आले आहेत.

ठळक मुद्देरात्री फिरून निराधारांचा शोध : आशिष अटलोए व टीमने जागविल्या संवेदना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले...’ राष्ट्रसंतांचे हे वचन समजणे सोपे, पण ते प्रत्यक्ष अंगिकारायला संवेदनशील मनाची गरज असते. असे संवेदनशील मन घेऊन रंजल्या गांजल्यांच्या सेवेलाच धर्म मानणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. आशिष अटलोए हे होय. उन्हाळा, पावसाळ्यात वेगवेगळ्या रूपाने गरीब, निराधारांना मदत करणारे डॉ. अटलोए हिवाळ्याच्या दिवसांत ‘ब्लँकेटदूत’ म्हणून पुढे आले आहेत. रस्त्याच्या कडेला थंडीत कुडकुडणाऱ्या गरीब, निराधारांना ब्लँकेटद्वारे मायेचे उबदार पांघरूण घालत ते मानवतेचे ऋण जोपासत आहेत.थंडीचा जोर आता वाढत चालला आहे. श्रीमंत असो वा गरीब थंडीचा तडाखा सर्वांनाच सोसावा लागतो. या अवस्थेत रस्त्याच्या कडेला, फूटपाथवर, डिव्हायडरवर, मंदिराच्या आश्रयाने, बसस्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर अनेक ठिकाणी गरीब, निराधार, निराश्रित माणसे थंडीमुळे कुडकुडत झोपलेली असतात. अशा माणसांच्यासाठी अनेकांच्या मनात संवेदना जागतही असेल, पण प्रत्येकाची जाणीव कृतीत उतरेलच असे नाही. पण डॉ. अटलोए यांनी संवेदनेला कृतीचे कोंदण लावले. गारठविणाऱ्या थंडीत रस्त्यावर झोपणाऱ्या निराश्रितांचे, त्यातल्या चिमुकल्यांचे काय हाल होत असतील, या एका विचाराने अस्वस्थ झालेल्या डॉ. अटलोए यांनी सहा वर्षांपूर्वी अशा निराधारांना ब्लँकेट वाटण्याचे काम सुरू केले. रात्री फिरून फिरून अशा निराश्रितांना शोधायचे, त्यांच्या अंगावर पांघरूण घालायचे आणि जेवणाची विचारपूस करून तेही पुरवायचे आणि एक आत्मिक समाधान घेऊन परतायचे. या त्यांच्या सेवाकार्यात सहकारी जुळणार नाही तर नवल. कैलास कुथे, नीलेश नागोलकर, शीलदेव दोडके, अशोक गाडेकर, चंद्रकांत चोथे, सुशील मौर्य, जयराज मार्कंड, गुंजन रठ्ठे हे सहकारी त्यांच्या सेवाकार्यात आपसुकच जुळले आणि ब्लँकेटदूत म्हणून सेवारत झाले.समाजात गरीब-श्रीमंत अशी दरी वाढत चालली आहे. ही दरी कमी करणे सहज शक्य नाही. पण दारिद्र्याचे, अभावाचे चटके सहन करीत आयुष्य कंठणाऱ्यांना थोडी मदत केली तर त्यांच्या दु:खाची झळ थोडी तरी कमी होणार नाही. शेवटी जीवनात चांगल्या लोकांना शोधू नका, स्वत: चांगले व्हा नक्कीच कुणीतरी तुम्हाला शोधत येईल हाच मानवधर्माचा मंत्र आहे. हा मंत्र घेउन डॉ. आशिष अटलोए यांनी प्रेरणेचा झरा वाहता केला आहे.

 अशी करतात मदत  डॉ. आशिष अटलोए आणि त्यांचे सहकारी मागील सहा वर्षापासून रस्त्यावर कोणी थंडीत कुडकुडत दिसल्यास त्याबाबत कळविण्याचे आवाहन व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून करतात. दररोज त्यांना १७-१८ संदेश येतात. निरोप मिळताच ही टीम तेथे जाऊन गरजूला ब्लँकेट देते. रस्त्यावर झोपलेली व्यक्ती बहुधा उपाशीपण असते, त्यांच्यासाठी प्रसंगी ब्रेड, बिस्कीट किंवा जेवणाची व्यवस्थाही केली जाते. ज्यांना कुणाला असे गरीब, निराश्रित दिसतील त्यांनी डॉ. अटलोए यांच्या ९९२२७६५६७८ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

  वेगवेगळ्या रूपाने मदत हिवाळ्यात ब्लँकेट दूत झालेल्या डॉ. अटलोए व त्यांच्या सहकाऱ्यांचे मदतीचे रूप वेगळेच असते. ते उन्हाळ्यात गरीब, निराधार, अनवाणी पायांसाठी चप्पल दूत होतात, तर पावसाळ्यात छत्र्या, गरीबांच्या घरांसाठी ताडपत्री देत पुढे येतात. पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणून कुंड्यांचे वितरण करण्याचे काम ते करीत असतात. त्यासोबतच गरजवंतांना शासकीय योजनेतून वैद्यकीय मदत मिळवून देणे, शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी मदत करणे हे त्यांचे नित्याचे काम. स्वातंत्र्य संग्राम सैनिक आजोबा गौरीशंकर अटलोए यांच्याकडून मिळालेला वारसा ते अभिमानाने चालवत आहे.

टॅग्स :nagpurनागपूर