शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 23:54 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने शनिवारी पारडी परिसरात धाड टाकून रेल्वेच्या ई -तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालाला अटक केली. त्याच्याकडून ९ ई-तिकिटे जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देदलाल अटकेत : ९ तिकिटे घेतली ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने शनिवारी पारडी परिसरात धाड टाकून रेल्वेच्या ई -तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालाला अटक केली. त्याच्याकडून ९ ई-तिकिटे जप्त करण्यात आली. यापूवीसुद्धा त्याने १५२ तिकिटे काढली असल्याची माहिती पुढे आली आहे.अजहर खान शकील खान (२१) रा. नेताजीनगर, सुभाननगर, पारडी असे आरोपीचे नाव आहे. पारडीतील सुभाननगर परिसरात एक व्यक्ती रेल्वे तिकिटांची अधिक भावाने विक्री करीत असल्याची गुप्त माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त ए. के. स्वामी यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून मोतीबागचे निरीक्षक गणेश गरकल यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक बी. के. सिंह, एम. के. विश्वकर्मा, विजय विठोले, विजय उमरेडकर, बी. हलमारे, महिला कर्मचारी पूनम यांचे पथक सुभाननगरात पोहोचले. अजहरची माहिती काढून घरावर धाड टाकली. संशयाच्या आधारे तपासणी केली. यात तो आपल्या नावे असणाऱ्या वैयक्तिक आयडीवरून मोठ्या प्रमाणावर तिकिटे काढत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या ईमेल आयडीवर अनधिकृतरीत्या काढलेल्या ९ तिकिटांची माहिती मिळून आली. ही तिकिटे ११ हजार ६९५ रुपये किमतीची आहेत. मोबाईलवरूनच तो तिकीट काढत होता. मोबाईलची तपासणी केली असता त्याने यापूवीर्ही १५२ तिकिटे काढली असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून मोबाईल व रोख रकमेसह एकूण २४ हजारापेक्षा अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास उपनिरीक्षक बी. के. सिंह करीत आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेticketतिकिटArrestअटक