शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन भाजपचे अडचणीत अधिकारी

By admin | Updated: November 7, 2015 03:26 IST

तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात भाजपने हलबा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलने केलीत.

चंद्रभान पराते यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश : भाजप आमदाराच्या पत्रालाही केराची टोपलीनागपूर : तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात भाजपने हलबा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलने केलीत. परंतु त्या आंदोलनाचा ठपका हलबा समाजाच्याच एका उपजिल्हाधिकाऱ्यावर ठेवून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचा प्रस्ताव पाठवण्यात आला. त्या चौकशीमध्ये काहीच तथ्य आढळून आले नाही. विभागीय आयुक्तांनी सुद्धा यासंदर्भात शासनाला अहवाल दिला. सध्या राज्यात सत्तांतर झाले आहे. काँग्रेसचे सरकार जाऊन भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. तरीही हलबा समजातील या अधिकऱ्याच्या मागील चौकशीचा ससेमिरा मात्र संपलेला नाही. खुद्द भाजपच्या आमदाराने महसूल मंत्र्यांना पत्र लिहून भाजपच्या आंदोलनामुळे या अधिकाऱ्यावर कसा अन्याय झाला, याची वस्तुस्थिती मांडली. मात्र आमदाराच्या पत्राला ही केराची टोपली दाखविण्यात आली असून या अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी करण्याचे आदेश बजावण्यात आले आहे. चंद्रभान पराते असे या हलबा समाजातील पीडित अधिकाऱ्यांचे नाव आहे. त्यांची सध्या बार्टीचे प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु त्यांना अजुन रुजू करून घेण्यात आलेले नाही.चंद्रभान पराते हे २००७ साली नागपुरात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. पराते हे हलबा समाजातील एक जागरुक अधिकारी म्हणून ओळखले जातात. भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनी गेल्या २६ सप्टेंबर रोजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना या प्रकाराबाबत सविस्तर पत्र लिहिले. या पत्राद्वारे त्यांनी सांगितले की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी २००७ मध्ये हलबांसाठी आंदोलने केली. मी (विकास कुंभारे) आणि आ. सुधाकर देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे मोर्चा काढला. त्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. यासंदर्भात विधानसभा व विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून हलबांना न्याय देण्याची मागणी केली. परंतु हलबांना न्याय मिळण्याऐवजी हलबा समाजाचे उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांच्यावर कार्यवाही झाली. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी जिल्हा प्रशासनावर दबाव आणला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी २०१० मध्ये राजकीय संगनमताने विभागीय चौकशीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. या प्रस्तावासंबंधी विभागीय आयुक्त नागपूर यांनी पराते यांच्याविरुद्ध लावलेल्या दोषारोप संदर्भात कोणतेही सबळ पुरावे नाहीत म्हणून शासनने उचित निर्णय घ्यावा, असा अहवाल २०१४ मध्ये शासनाकडे सादर केला. यावरून पराते यांच्यावर राजकीय द्वेषातून अन्याय होत आहे आणि आता विभागीय चौकशीचा प्रस्ताव कालबाह्य झाला आहे, ही बाब निदर्शनास आणूत देत सदर प्रस्तावित चौकशी रद्द करण्याची विनंती आ. कुंभारे यांनी पत्राद्वारे केली होती. विभागीय आयुक्त नागपूर यांनी दिलेला अहवाल आणि स्वत:च्या पक्षाच्या आमदारांनी सुद्धा सविस्तर माहिती दिल्यानंतरही महसूल मंत्र्यांनी चंद्रभान पराते यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश बजावले आहेत. गेल्या २९ सप्टेंबर रोजी यासंदर्भात आदेश विभागीय आयुक्तांना प्राप्त झाले असून दोषारोपाची चौकशी करण्यासाठी प्रादेशिक विशेष अधिकारी तर अहवाल सादर करण्यासाठी सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. शासनाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांनी कार्यवाही सुरू केली आहे. (प्रतिनिधी)