लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजपा नेते ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव यांनी खुनी हल्ला प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावला. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला.तपास अधिकाऱ्याने दोषारोपपत्र दाखल केले याचा अर्थ प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असा होत नाही. मुन्ना यादव यांना अटक झालेली नाही. सरकारने त्यांची विचारपूस करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यादव यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ ऐवजी ३२६ अंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यामुळे गुन्ह्याची गंभीरता कमी होत नाही. यादव यांच्या एकंदरीत वागण्यावरून ते कायद्याची तमा बाळगत नसल्याचे दिसून येते असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदविले. ही घटना २१ आॅक्टोबर २०१७ रोजी रात्री घडली होती. यादव यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी, अॅड. मोहित खंजांची व अॅड. उदय डबले तर, सरकारतर्फे अॅड. नितीन राव यांनी कामकाज पाहिले. अॅड. रजनीश व्यास यांनी सरकारला सहकार्य केले.
भाजपाचे मुन्ना यादव यांना अटकपूर्व जामीन नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 21:36 IST
भाजपा नेते ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव यांनी खुनी हल्ला प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावला. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला.
भाजपाचे मुन्ना यादव यांना अटकपूर्व जामीन नाकारला
ठळक मुद्देहायकोर्ट : खुनी हल्ला प्रकरण