शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
4
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
5
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
6
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
7
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
8
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
9
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
10
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
11
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
12
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
13
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
14
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
15
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
16
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
17
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
18
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

भाजपचे 'अच्छे दिन'

By admin | Updated: October 16, 2014 23:17 IST

बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आठ मतदार संघांपैकी भाजपला सर्वाधिक पाच जागा मिळेल, असा अहवाल राज्य गुप्तचर वार्ता विभागाने शासनाला कळविला आहे.

जिल्ह्यात पाच जागा?: राज्य गुप्तचर वार्ता विभागाचा अहवालअमरावती : बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आठ मतदार संघांपैकी भाजपला सर्वाधिक पाच जागा मिळेल, असा अहवाल राज्य गुप्तचर वार्ता विभागाने शासनाला कळविला आहे. शिवसेना, काँग्रेस, अपक्ष व रिपाइंला प्रत्येकी एक जागा मिळेल, असा अंदाज आहे.राज्यात १५ वर्षे सत्तेत राहणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने पहिल्यांदाच स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढविली. अशातच २५ वर्षांपूर्र्वींची युती संपुष्टात आल्यामुळे भाजप, सेना विधानसभा निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे गेले. या निवडणुकीत आघाडी शासनाविरोधी वातावरण असल्याने भाजपने ही संधी चांगल्या पद्धतीने ‘कॅश’ केली. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे स्टार प्रचारक म्हणून राज्य प्रचाराने पिंजून काढला. भाजपमय वातावरण निर्माण करण्यात मोदींना यशदेखील आल्याचे झालेल्या मतदानानंतरचे चित्र पाहावयास मिळाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला खातेही उघडता आले नव्हते, हे खरे आहे. मात्र, यावेळच्या विधानसभा निवडणुकीत चक्क चार ते पाच जागा भाजपच्या वाट्याला येतील, असे मतदानानंतरचे चित्र आहे. चार जागांवर विजयी होणाऱ्या काँग्रेसला मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना करावा लागेल, असा अंदाज राज्य गुप्तचर वार्ता विभागाचा आहे. तिवसा मतदार संघाच्या काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांचा निसटता विजय होईल, असा अंदाज बांधला जात आहे. यशोमती ठाकूर यांना शिवसेनेचे दिनेशनाना वानखडे, भाजपच्या निवेदिता चौधरी यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागेल, असे अहवाल म्हटले आहे.अमरावती मतदारसंघातून भाजपचे सुनील देशमुख हे सरशी ठरतील, असे गृहीत आहे. मात्र काँग्रेसचे रावसाहेब शेखावत यांना मुस्लिम, हिंदी भाषिक मते तर शिवसेनेचे प्रदीप बाजड यांनी मराठी मते घेतली. बसपचे मिर्झा नईम बेग, मुस्लिम लिगचे इमरान अशरफी यांनी मुस्लिम मतांचे विभाजन केल्यामुळे अमरावतीत धक्कादायक निकाल लागण्याचे संकेत आहे. बडनेरा मतदार संघातून अपक्ष रवी राणा यांची बाजू भक्कम असल्याचा अंदाज आहे. परंतु काँग्रेसच्या सुलभा खोडके, शिवसेनेचे संजय बंड, भाजपचे तुषार भारतीय यांचे राणांना तगडे आव्हान आहे. मोर्शीत अनिल बोंडे यांच्या बाजूने निकाल लागेल, असा अंदाज आहे. परंतु शिवसेनेचे उमेश यावलकर, राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुख, काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे हेसुद्धा शर्यतीत आहेत. धामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजपचे अरुण अडसड आणि काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांच्यात थेट लढत असली तरी मोदी यांची चांदूररेल्वेत सभा झाल्यानंतर या मतदार संघात वातावरण बदलले. मागे पडलेले अरुण अडसड मतदानानंतर अव्वलस्थानी असल्याचा अंदाज आहे. अडसड यांना काँग्रेसचे वीरेंद्र जगताप, बसपचे अभिजित ढेपे तर शिवसेनेचे सिद्धेश्वर चव्हाण यांचे आव्हान आहे.