शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

भाजप मार्जिन वाढवण्याच्या कामाला तर काँग्रेस मरणासन्न : शिवराजसिंह चौहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 21:14 IST

भाजप प्रचंड विजयानंतर आनंदोत्सवात बुडालेला नाही, तर आपल्या विजयाची मार्जिन वाढवण्याच्या कामाला लागला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस मरणासन्न अवस्थेत आहे. त्यांच्यात धावपळ माजली आहे. कोण कुणाला राजीनामा देत आहे, हेच समजून येत नाही, अशी टीका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपच्या सदस्यता अभियानाचे संयोजक शिवराजसिंह चौहान यांनी येथे केली.

ठळक मुद्देसदस्यता मोहिमेस म्हणाले राष्ट्रीय पुनर्निर्माण अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजप प्रचंड विजयानंतर आनंदोत्सवात बुडालेला नाही, तर आपल्या विजयाची मार्जिन वाढवण्याच्या कामाला लागला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस मरणासन्न अवस्थेत आहे. त्यांच्यात धावपळ माजली आहे. कोण कुणाला राजीनामा देत आहे, हेच समजून येत नाही, अशी टीका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपच्या सदस्यता अभियानाचे संयोजक शिवराजसिंह चौहान यांनी येथे केली.सदस्यता अभियानाचा आढावा घेण्यासाठी ते गुरुवारी नागपुरात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. शिवराज सिंह यांनी शहर भाजपला प्रत्येक बुथवर २०० कार्यकर्ते बनवण्याचे लक्ष्य देत काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, भाजप सदस्यता अभियानाच्या माध्यमातून ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही तिथे यशस्वी होण्याचा प्रयत्न करण्याच्या कामाला लागला आहे. तसेच ज्या ठिकाणी भाजपला यश मिळाले आहे, तिथे विजयाची मार्जिन आणखी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. सदस्यता अभियानास राष्ट्रीय पुनर्निर्माण अभियान असल्याचे सांगत या माध्यमातून पक्ष जनतेला प्रगतीशी जोडू इच्छित आहे. दुसरीकडे काँग्रेस ‘व्हेंटिलेटर’वर आहे. त्यांच्या अध्यक्षांचा पत्ता नाही. भाजपने अमित शाह गृहमंत्री होताच जे. पी. नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष बनवले.एका प्रश्नाच्या उत्तरात शिवराज सिंह यांनी सांगितले की, सदस्यता अभियानांतर्गत प्रत्येक वर्गाला जोडून भाजपला सर्वव्यापी बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात कलावंतांचाही समावेश आहे. डॉक्टर, इंजिनियर, सीए याशिवाय त्या वर्गांनाही जोडले जाईल जे भाजपसोबत नाहीत.महात्मा गांधी यांचे स्वप्न नकली गांधी पूर्ण करेलयावेळी शिवराज सिंह यांनी गांधी कुटुंबावर प्रहार केला. ते म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसला विसर्जित करावे, असे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. आजचे नकली गांधी त्यांची ती इच्छा पूर्ण करतील. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर टीका करीत ते म्हणाले की, डुबत्या जहाजातून लोक उडी घेत होते, परंतु काँग्रेसचे कॅप्टन (अध्यक्ष) यांनीच सर्वप्रथम काँग्रेसरुपी जहाज सोडले. देशात विरोधी पक्ष शिल्लकच नाही. काँग्रेस आज एका परिवाराची गुलाम बनली आहे. आई-मुलाच्या जोडीने नरसिंहराव यांना विसरण्यास भाग पाडले. ते नवीन नेतृत्व निर्माण होऊ देत नाही. सीताराम केसरी यांना बेदखल करणे, याचे उदाहरण आहे.काँग्रेसला सांभाळता येत नाही आमदारकाँग्रेस आमदारांना भाजप आपल्याकडे ओढत असल्याच्या प्रश्नावर शिवराज सिंह यांनी काँग्रेसलाच आमदार सांभाळता येत नसल्याची टीका केली. भाजपने त्यांच्यासाठी स्वतंत्र काऊंटर उघडलेले नाही. कर्नाटकचा उल्लेख करीत कुमारस्वामी यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा, असेही ते म्हणाले.अनुशासनहीनता सहन करणार नाहीअधिकाऱ्यांवर बॅट उचलणाऱ्या भाजप आमदार आकाश विजयवर्गीयबाबतच्या प्रश्नावर मौन धारण करणारे शिवराज सिंह आज म्हणाले, अनुशासनहीनता खपवून घेतली जाणार नाही. अनुशासन हे सर्वात वर आहे. ते न करणाऱ्यांवर कारवाई होईल.बलात्काराच्या आरोपींना फाशी द्याभोपाळ रेपकांडाच्या आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावल्या गेल्याच्या निर्णयाचे स्वागत करीत शिवराज सिंह यांनी बलात्काराच्या आरोपींना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी. नागरिक या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयाला पोस्टकार्ड पाठवण्याची तयारी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानBJPभाजपा